ETV Bharat / city

भाजपा पदाधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी शिवसेनेच्या जंजाळ यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

लसीकरण केंद्रांवर टोकनचा काळाबाजार केल्याच्या संशयातून शिवसेनेच्या सात ते आठ कार्यकत्र्यांनी भाजपा ओबीसी सेलचे शहराध्यक्ष प्रा. गोविंद केंद्रे यांना सूतगिरणी चौकात बेदम मारहाण केली होती. या प्रकरणात युवासेनेचे पदाधिकारी आणि माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यासह 7 ते 8 कार्यकर्त्यांविरुद्ध जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
author img

By

Published : Jul 28, 2021, 10:33 PM IST

औरंगाबाद - लसीकरण केंद्रांवर टोकनचा काळाबाजार केल्याच्या संशयातून शिवसेनेच्या सात ते आठ कार्यकत्र्यांनी भाजपा ओबीसी सेलचे शहराध्यक्ष प्रा. गोविंद केंद्रे यांना सूतगिरणी चौकात बेदम मारहाण केली होती. या प्रकरणात युवासेनेचे पदाधिकारी आणि माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यासह 7 ते 8 कार्यकर्त्यांविरुद्ध जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जवाहर नगर पोलिसात गुन्हा दाखल

सोमवारी दि. 26 जुलै रोजी भाजपा ओबीसी सेलचे शहराध्यक्ष गोविंद केंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ, अमोल पाटे, आकाश राऊत यांच्यासह इतर चार ते पाच अनोळखी कार्यकर्ते त्यांच्याविरुद्ध कलम 143, 147, 149, 323, 324, 504, 506 भादंवि सहकलम 135 मपोकानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रा. गोविंद परशुराम केंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 26 जुलै रोजी सकाळी दहा ते साडेदहाच्या सुमारास विजयनगरातील महापालिका आरोग्य केंद्रात कोविड लसीकरण सुरू होते. माझी पत्नी विमल केंद्रे ही मेहरनगर वॉर्ड क्रमांक 96 ची माजी नगरसेविका असल्याने प्रतिनिधी म्हणून मी लसीकरण केंद्रावर गेलो असता जंजाळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी वाद घालून मारहाण केल्याचा आरोप केंद्रे यांनी केला.

जंजाळ यांनी मारहाण केल्याचा आरोप
लसीकरण केंद्रांवर काही लोक दादागिरी करत होते. त्यांना जाब विचारला असता त्यांनी जंजाळ यांचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले. त्यांनी अरेरावी सुरू करत वाद घातला. त्यानंतर त्यांनी जंजाळ यांना फोन करून बोलावून घेतलं. त्यावेळी गोविंद केंद्रे आणि त्यांचा पुतण्या धीरज केंद्रे यांच्यासोबत जंजाळ व त्यांच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची सुरू झाली. त्यानंतर जंजाळ आणि मी चहा घेण्यासाठी त्यांच्या गाडीत बसलो. तेव्हा जंजाळ यांनी मला फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या सूतगिरणी चौकातील कार्यालयात नेले. मी बाहेर उभा असताना पाठीमागून डाव्या खांद्याच्या खालच्या बाजूला पाठीत जोरात दोन-चार बुक्के मारले. त्यावेळीच समोर उभ्या असलेल्या कार्यकर्त्याने शिवीगाळ करत कानशिलात लगावल्या. त्यामुळे मी जमिनीवर कोसळलो. त्यात पाठीला मुका मार लागल्याने बेशुद्ध पडलो, असे गोविंद केंद्रे यांनी फिर्यादीत म्हटले होते, त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक भारत पाचोळे करत आहेत.

हेही वाचा - झोमॅटोचा IPO मिळाला नसेल तर चिंता नको, आणखी बंपर आयपीओ येणार...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.