ETV Bharat / city

चंद्रकांत खैरेंना आणखी एक साक्षात्कार, म्हणाले - बाळासाहेबांकडे होती दैवीशक्ती - चंद्रकांत खैरे

बाळासाहेब ठाकरेंना दैवीशक्ती होती, असे वक्तव्य शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी केले आहे.

चंद्रकांत खैरे
author img

By

Published : Jun 8, 2019, 2:22 PM IST

औरंगाबाद - बाळासाहेब ठाकरेंना किती दैवीशक्ती होती, हे मला प्रत्यक्षात पाहायला मिळाले आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी केले आहे. ते आज सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात वाघांच्या बछड्यांच्या नामकरण सोहळ्यासाठी आले होते.

चंद्रकांत खैरे

मी वनमंत्री असताना नॅशनल पार्कमध्ये काय सुरू आहे, हे पाहण्यासाठी बाळासाहेबांना घेऊन गेलो. त्यावेळी बाळासाहेबांनी मला वाघ पाहायचा आहे, असे म्हटले. त्यानंतर मी त्यांना वाघाच्या पिंजऱ्याजवळ घेऊन गेलो. तेव्हा एका वाघाच्या पिंजऱ्यासमोर बाळासाहेबांनी हात केल्यानंतर वाघाने त्यांच्या हातावर पंजा मारला, त्यांच्या हातात पंजा दिला. त्यावेळी आम्हाला बाळासाहेबांना किती दैवीशक्ती आहे. हे जवळून पाहायला मिळाले, असे खैरे म्हणाले.

या आधीही केले आहे असेच वक्तव्य

मी जप केला की गंभीर आजारी असलेल्या रुग्णाला बरे वाटते. आजपर्यंत प्रमोद महाजनांची केस वगळता माझा प्रयोग फसलेला नाही, असा दावा खैरेंनी याआधीही एका सार्वजनिक कार्यक्रमात केला होता.

Intro:औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात आगळावेगळ बारसं पार पडलं. या बारशाच्या कार्यक्रमात तीन मुलींची तर एक मुलाचं नाव ठेवण्यात आलं. प्रगती, देविका, अर्पिता आणि कुश अस नाव त्यांचं ठेवण्यात आलं. नेमका कोणाचं हे बारसं होत हा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. ते ही नाव ठेवली आहेत वाघांच्या बछड्यांची.Body:सिद्धार्थ आणि समृद्धी या वाघांना काही दिवसांपूर्वी औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात चार बछडे झाली. यामध्ये दोन पांढरे आणि दोन पिवळे बछडे आहेत.Conclusion:Vo1 - औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात आज वेगळाच सोहळा साजरा करण्यात आला. छोटासा सजवलेला मंडप उभारण्यात आला होता. मंडपात लावलेले फुगे आणि मंद आवाजात सुरू असलेल संगीत कार्यक्रमाची शोभा वाढवणारे होते. ही सर्व तयारी होती ती नामकरण म्हणजेच बारश्याची. औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात वाघाच्या चार बछड्यांच आगमन काही दिवसांपूर्वी झालं. या बछड्यांची नाव ठेवण्यासाठी महानगर पालिकेच्या वतीने लहान मुलांना नाव सुचवण्याची विनंती करण्यात आली होती. या आवाहनाला प्रतिसाद मिळाला आणि जवळपास दीड हजार नाव महानगर पालिकेकडे आली. त्यापैकी चाळीस नाव महानगर पालिकेने निवडली. त्यामध्ये 30 नाव मुलींची तर 10 नाव मुलांची होती. निवडलेल्या नावांच्या चिठ्य्या ठेवून ड्रॉ पद्धतीने नाव बछड्यांची नाव काढण्यात आली. प्रगती, देविका, अर्पिता आणि कुश अशी नाव या बछड्यांची ठेवण्यात आली. शिवसेनेचा वर्धापन दिन असल्याचं औचित्त साधून या बछड्यांचा नामकरण सोहळा घेण्यात आला असून सोहळ्याचा आनंद होत आल्याचं मत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केलं.

Byte - चंद्रकांत खैरे - शिवसेना नेते

Vo2 - या कार्यक्रमाला शहरातील निवडक नागरिकांसह बच्चेकंपणीने देखील हजेरी लावली होती. या नामकरण सोहळ्यात वेगळाच अनुभव आणि मजा आल्याचं नामकरण सोहळ्याला उपस्थित असलेल्या मुलीने सांगितलं.

Byte - प्राजक्ता चौधरी - प्राणी मित्र

Vo3 - वाघांच्या बछड्यांचा नामकरण सोहळ्याचा कार्यक्रम आनंददायी असला तरी या कार्यक्रमात देखील राजकारण तापताना दिसलं. खासदार इम्तियाज जलील यांचं नाव निमंत्रण पत्रिकेत न टाकल्याने एमआयएमच्या नगरसेवकांनी आंदोलन केल. मात्र या विरोधाला न जुमानता महानगर पालिकेने नामकरण सोहळा पार पाडला. या सोहळ्याने सिद्धार्थ प्राणिसंग्रलयात बच्चे कंपनीसाठी नवी पर्वणी उद्यानात पाहायला मिळणार आहे.
(Pl Make special pkg)
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.