औरंगाबाद - राज्यात सुरू केलेल्या योजना भाजपच्या भल्याच्या नसून राज्याच्या भल्याच्या होत्या. असे सुडाच राजकारण करू नये त्यांचा जो काही पंगा आहे तो आमच्या पक्षाशी आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादेत केली.
शिवसेना तत्व गुंडाळून सत्तेत आली हे सर्वाना माहित असल्याचा टोला चंद्रकांत पाटील यांनी लावला. आमचा पंगा शिवसेनेशी नाही. मात्र त्यांनी राष्ट्रवादी पासून सावध राहवं, असा सल्ला पाटील यांनी शिवसेनेला दिला. मतदारांनी आपल्या दोघांना मतदान दिल्याने इतक्या जागा मिळवणं शक्य झालं हे शिवसेनेने लक्षात ठेवावे. राज्यातील विकास काम बंद केल्यावर लोक तुम्हाला काय पेढे देणार आहे का? असा टोला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लावला.
नवीन सरकारने विकास कामांच्या योजना बंद करायला सुरुवात केली आहे. त्यात २५-१५ च्या कामे बंद केली आहेत. अनेक पाण्याच्या योजना बंद केल्या आहेत. सुरू केलेली कामे भाजपच्या भल्याची नव्हती, ती राज्याच्या भल्याची होती असे सांगत, जो काही पंगा आहे तो आमच्या पक्षाशी आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
राज्यात सुडाचे राजकारण सुरू आहे. मराठा आणि कूणबी युवकांसाठी सुरू केलेली सारथी योजनादेखील सरकारने अनेक निर्बंध घातले. आता पर्यंत ५०० जणांना या योजनेचा फायदा झाला आहे. अशाने सरकार राज्याच्या हिताचे काम करत नसल्याचे दिसून येत असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी औरंगाबादेत पत्रकरांशी बोलताना लावला.