ETV Bharat / city

औरंगाबादमध्ये लहान मुलांच्या सर्कतेमुळे अट्टल चोर जेरबंद

दोघा चिमुकल्यानी दिलेल्या माहितीमुळे आसपासचे नागरिक घराभोवती जमा झाले. पोलिसांनी घराच्या आवारात प्रवेश केला असता दाराचा कडीकोंडा तुटलेला होता. पोलिसांनी झाडाझडती सुरू केली मात्र कोणीच आढळून आले नाही. त्याचवेळी कोणीतरी खिडकीला बाहेरून लटकलेल्या अवस्थेत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांनी तात्काळ त्या चोराला वर ओढत ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपण चोरी करायला आल्याचे सांगितले.

burglary arrested by  aurangabad police due to childrens alertness
औरंगाबादमध्ये लहान मुलांच्या सर्कतेमुळे अट्टल घरफोड्या जेरबंद
author img

By

Published : Oct 5, 2020, 10:22 PM IST

Updated : Oct 5, 2020, 10:48 PM IST

औरंगाबाद - आजकालची लहान मुल कमालीची हुशार असतात असे म्हणतात. मात्र, त्याचा प्रत्यय औरंगाबादेत आला. रात्री सायकल खेळत असताना एका घरात चोर शिरल्याचं दोन चिमुकल्यांना दिसले. घाबरून न जाता त्यांनी शेजाऱ्यांना आणि आपल्या पालकांना सांगितले. त्यामुळे काही क्षणात अट्टल घरफोड्या पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

औरंगाबादमध्ये लहान मुलांच्या सर्कतेमुळे अट्टल घरफोड्या जेरबंद
यथार्थ जंजाळ आणि श्रेयस झाल्टे असे या दोन चिमुकल्यांचे नाव आहे. दोघेही सहावी वर्गात शिकतात. रविवारी रात्री दहाच्या सुमारास दोघेही मित्र सायकल खेळत असताना एक व्यक्ती एका बंगल्यात जाताना दिसली. त्यांना संशय आला त्यामुळे दोघांनी घराजवळ जाऊन भिंतीला कान लावले असता आत मधून काही ठोकत असल्याचा आवाज आला आणि त्यावर संशय पक्का झाला त्यावर मुलांनी केलेल्या कृतीमुळे घरफोडी टळलीच त्याचबरोबर चोर ही पोलिसांच्या हाती लागला.यथार्थ जंजाळ आणि श्रेयस झाल्टे हे दोघे मित्र दररोज रात्री सायकल खेळण्याचा आनंद घेतात. दोन दिवसांपूर्वी एक व्यक्ती संशयितरित्या त्यांना आपल्या परिसरात फिरताना दिसला. त्यामुळे दोघांना संशय आला मात्र त्यांनी लक्ष दिले नाही. मात्र, तीच व्यक्ती पुन्हा संशयितरित्या फिरताना दिसून आली. त्या व्यक्तीच्या हातात लोखंडी सळई होती. काही अंतरावर एक बंद घराच्या संरक्षण भिंतीवर चढून तो घरात गेला. हे सर्व या दोघांनी पाहिलं. न घाबरता ते त्या घराजवळ गेले. त्यांनी घराचा कानोसा घेतला. इतकेच नाही तर बाजूला असलेल्या घराजवळ जाऊन त्या घराच्या भिंतीला कान लावले असता आतून काहीतरी ठोकत असल्याचा आवाज आला. संशय बळावताच श्रेयसने आपल्या वडिलांना तर यथार्थने आपले वडील माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांना माहिती दिली. राजेंद्र जंजाळ यांनी पुंडलिक नगर पोलिसांना माहिती दिली. त्याचवेळी दोघा चिमुकल्यानी दिलेल्या माहितीमुळे आसपासचे नागरिक घराभोवती जमा झाले. पोलिसांनी घराच्या आवारात प्रवेश केला असता दाराचा कडीकोंडा तुटलेला होता. पोलिसांनी झाडाझडती सुरू केली मात्र कोणीच आढळून आले नाही. त्याचवेळी कोणीतरी खिडकीला बाहेरून लटकलेल्या अवस्थेत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांनी तात्काळ त्या चोराला वर ओढत ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपण चोरी करायला आल्याचे सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या नाहीतीनुसार अटक करण्यात आलेला चोर अट्टल घरफोड्या आहे. याआधी त्याच्यावर सात ते आठ प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी चोराला अटक केली असून दोनही मुलांनी दाखवलेल्या हुशारीचे त्यांनी कौतुक केले. इतक्या लहान वयात त्यांनी दाखवलेली समयसुचकता त्यामुळे अट्टल घरफोड्या अटक झाला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली. आजची पिढी चाणाक्ष, बुद्धिमान आणि सतर्क असल्याचे नेहमी बोलले जाते. त्याचा प्रत्यय यथार्थ जंजाळ आणि श्रेयस झाल्टे यांच्या कृतीमुळे दिसून आला हे नक्की.

Last Updated : Oct 5, 2020, 10:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.