औरंगाबाद - स्पोर्ट्स बाईकवर (Sport Bike) भरघाव वेगाने जात पादचाऱ्यांच्या हातातील मोबाईल हिसकवणाऱ्या बंटी -बबलीला वेदांतनगर पोलिसांनी पाठलाग करून पकडले. यावेळी गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह चोरी केलेले मोबाईल (Stolen mobile along with two-wheeler used in crime) जप्त करण्यात आले आहेत.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, ऋषिकेश रमेश रोडे (वय २१) आणि मानसी ऋषिकेश रोडे (वय १८, दोघे रा. चोर नारायणगाव, ता. पैठण) अशी या दांपत्याची नावे आहेत. वेदांतनगर भागात पादचाऱ्यांचे मोबाइल हिसकावण्याच्या घटना मागील पंधरा दिवसांमध्ये वाढल्या होत्या. काहीजण प्रवासी असल्याने ते पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले नव्हते. परंतु, तीन ते चार जणांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साध्या वेशात पोलिसांची गस्त सुरू करण्यात आली होती.
Bunty- Bubbly Arrested In Aurangabad: स्पोर्ट्स बाईकवर बसून मोबाईलची करायचे 'धूमस्टाईल' चोरी, बंटी- बबलीला अखेर अटक - वेदांतनगर पोलिस ठाणे
स्पोर्ट्स बाईकवर बसून रस्त्याने जाणाऱ्या लोकांचे मोबाईल हिसकावून घेत 'धूमस्टाईल' चोरी ('Dhoomstyle' Theft By Snatching Mobile Phones Of Passers-By On Sports Bike) करणाऱ्या बंटी आणि बबलीला वेदांतनगर पोलिसांनी अखेर जेरबंद केले (Bunty, Bubbly Arrested) आहे. हे दोघे चोरीच्या मोबाईलची विक्री (Sale Of Stolen Mobiles) करून, त्यातून आलेल्या पैशांतून सातत्याने हॉटेलमधून जेवण आणून मौजमजा करायचे असे पोलिसांच्या चौकशीतून (Police Inquiry) समोर आले आहे.