औरंगाबाद (कन्नड) - तालुक्यातील नेवपुर यथे सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून, बहिणीला त्रास देतो म्हणून साल्यानेच मेव्हण्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार (Aurangabad Crime) समोर आला आहे. कडूबा साळुंखे असं मृत इसमाचे नाव आहे.
बहिणीला त्रास देतो म्हणून साल्याने केली मेव्हण्याची हत्या बहिणीला त्रास देतो म्हणून मेव्हण्याची हत्याकडुबा साळुंके हे कन्नड तालुक्यातील पिशोर येथील रहिवासी होते. ते मद्याच्या आहारी गेले होते. त्यामुळे ते दारू पिऊन त्यांच्या पत्नीला नेहमी मारहाण करत होते. याबाबत त्यांचा साला सोमनाथ खांदवे याने जाब विचारला. मात्र, बहिणीला होणारा त्रास कमी होत नव्हता. त्यामुळे भाऊजीचा काटा काढायचा असा त्याने निश्चय केला आणि 11 जानेवारी रोजी धारदार शस्त्राने कडुबा साळुंखे याची हत्या केली. अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक पवन बन्सोड यांनी दिली.
पूर्णा - नेवपूर प्रकल्पाजवळ आढळून आलता मृतदेह11 जानेवारी रोजी कडुबा साळुंखे यांचा मृतदेह चाळीसगाव रस्त्यावर नेवपुर येथे पूर्णा - नेवपुर प्रकल्पाजवळ आढळून आला होता. मृतदेहाचा अवस्था पाहता त्यांची ओळख पटवणे अवघड झालं होतं. मात्र पोलिसांनी आपली तपास करण्यास सुरूवात केली. कडुबा साळुंखे किशोर तालुक्यातील रहिवासी असल्याचं कळालं. त्यानुसार चौकशी करून सोमीनाथ खांदवे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी अटक करतात सोमीनाथने सत्य सांगितलं. अकरा तारखेला आरोपी सोमीनाथने कडुबा याला जेवणासाठी आमंत्रण दिलं. त्यानंतर त्याला दारू पाजली आणि बहिणीला का त्रास देतो? असा जाब विचारला. त्यानंतर त्यांना चाळीसगाव रस्त्यावर पूर्ण नेवपूर प्रकल्पाजवळ आणून आधी गळा दाबला आणि त्यानंतर धारदार शस्त्राने त्याची हत्या केली, असा जवाब सोमनाथ खांदवे याने दिला. त्यावरून सोमनाथ खांदवे याला अटक करण्यात आली आहे अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक पवन बन्सोड यांनी दिली.
हेही वाचा - Thane Crime : केवायसीच्या नावाखाली १६ लाखाचा गंडा