औरंगाबाद - मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray Public Meeting in Aurangabad ) यांची जाहीर सभा बुधवारी ( दि. 8 जून ) सायंकाळी संस्कृतिक क्रीडा मंडळ मैदानावर होणार आहे. मात्र, त्या आधीच भाजपने शहरात 'संभाजीनगर'बाबत जनता प्रश्न विचारात आहे, अशी बॅनरबाजी करत कुरघोडी केली आहे.
संभाजीनगरच्या घोषणेचा वर्धापन दिन? - उद्धव ठाकरे यांच्या सभा स्थळापासून अवघ्या काही अंतरावर भाजपने संभाजीनगर बाबत जनता प्रश्न विचारात आहे, असा बॅनर लावला आहे. बुधवारी (दि. 8 जून) औरंगाबाद शिवसेना वर्धापन दिन आहे. मात्र, हा वर्धापन दिन संभाजीनगर नावाच्या घोषणेचा वर्धापन दिन.? जनता वाट पाहत आहे, अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत.
शहरात 15 बॅनर - औरंगाबाद शहरात वेगवेगळ्या भागांमध्ये शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर लावले आहेत. मात्र, 15 ठिकाणी भाजपने कुरघोडी करणारे बॅनर लावले आहेत. ज्यामध्ये वर्धापन दिन कशाचा?, संभाजीनगर नावाच्या घोषणेचा?, टँकर लॉबीचा वर्धापन दिन?स, पाणी प्रश्नाचा वर्धापन दिन?, गुंठेवारी फसा वर्धापन वर्धापन दिन? अशा आशयाचे बॅनर शहारात लावत भाजपने शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ही शहरवासियांच्या मनातील प्रश्न असल्याच भाजप जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांनी सांगितले.
हेही वाचा - अखेर 'त्या' मृतदेहाची ओळख पटली; पत्नी आणि तिच्या भावाच्या कुटुंबियाने केली हत्या