ETV Bharat / city

Uddhav Thackeray : भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यामुळे देशावर नामुष्की ओढावली.. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल - नुपूर शर्मा वादग्रस्त वक्तव्य

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त टिप्पणीवर ( Prophet remarks controversy ) ठाकरे म्हणाले की, मध्यपूर्व आणि अरब देशांनी आमच्या देशाला गुडघे टेकण्यास भाग पाडले. आम्हाला माफी मागण्यास भाग पाडले. "हे कशामुळे घडले? भारताने माफी का मागितली पाहिजे. देशाने असे काय केले आहे? हा गुन्हा भाजप आणि त्यांच्या टिनपाट प्रवक्त्यांनी केला आहे," अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचा समाचार ( Uddhav Thackeray on Prophet controversy ) घेतला.

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे
author img

By

Published : Jun 9, 2022, 11:03 AM IST

Updated : Jun 9, 2022, 11:10 AM IST

औरंगाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सांगितले की, भाजपमुळे देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर लाजिरवाण्या परिस्थितीला सामोरे जावे लागले. कारण अरब देशांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य ( Prophet remarks controversy ) केल्याबद्दल भारताकडे माफी मागायची मागणी केली. हे सर्व भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यांमुळे घडले, असे म्हणत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल ( Uddhav Thackeray on Prophet controversy ) केला.

औरंगाबाद येथील सभेत ते बोलत होते. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त टिप्पणीवर ते म्हणाले की, मध्यपूर्व आणि अरब देशांनी आमच्या देशाला गुडघे टेकवून आम्हाला माफी मागायला भाग पाडले. "हे कशामुळे घडले? भारताने माफी का मागितली पाहिजे. देशाने असे काय केले? हा गुन्हा भाजप आणि त्यांच्या प्रवक्त्यांनी केला आहे," असे ठाकरे म्हणाले. "भाजपचे प्रवक्ते किंवा भाजपने बोललेले शब्द कोणत्याही मुद्द्यावर भारताचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत. भाजपच्या प्रवक्त्याने वापरलेल्या शब्दामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा डागाळली गेली. त्यामुळे भाजपची नव्हे तर माझ्या देशाची प्रतिमा खराब झाली.," असेही ठाकरे म्हणाले.

"आमच्यात (शिवसेना आणि भाजप) राजकीय मतभेद आहेत, पण ते (नरेंद्र मोदी) आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांचा फोटो कचऱ्याच्या डब्यांवर (काही देशांमध्ये) अडकला होता आणि तो आम्ही पाहतोच आहोत. जेव्हा चूक भाजप आणि त्यांच्या प्रवक्त्याकडून केली जाते तेव्हा देशाने माफी का मागावी?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

प्रेषित मोहम्मद यांच्यावरील कथित अपमानास्पद वक्तव्यावरून काही मुस्लीम देशांतून निषेध वाढल्यानंतर भाजपने रविवारी नुपूर शर्माला निलंबित केले आणि दिल्ली युनिटचे मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांची हकालपट्टी केली. शर्मा यांच्या टिप्पण्या आणि जिंदालच्या ट्विट्समुळे काही अरब देशांमध्ये भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणारे ट्विटर ट्रेंड वाढले आहेत. ठाकरे म्हणाले, "मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना विचारायचे आहे की, त्यांना भाजपकडून अशा वर्तनाची अपेक्षा होती का?, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : Cm Uddhav Thackeray : फडवणीस म्हणतात गधाधारी, आम्ही 'गधा' सोडलायं; उद्धव ठाकरेंचा टोला

Last Updated : Jun 9, 2022, 11:10 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.