ETV Bharat / city

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप आक्रमक; औरंगाबादेत आंदोलन

ओबीसी आरक्षणाप्रकरणी भाजप आक्रमक झाले आहे. भाजप ओबीसी मोर्चा औरंगाबादच्यावतीने क्रांतिचौक भागात आंदोलन करण्यात आले.

author img

By

Published : Jun 3, 2021, 6:36 PM IST

Updated : Jun 3, 2021, 7:56 PM IST

BJP agitation in Aurangabad
भाजपचे औरंगाबादेत आंदोलन

औरंगाबाद - भाजप ओबीसी मोर्चा औरंगाबादच्यावतीने क्रांतिचौक भागात आंदोलन करण्यात आले. विना परवानगी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होते.

भाजपचे औरंगाबादेत आंदोलन

हेही वाचा - मुकेश अंबानी यांनी 'इतके' घेतले वेतन; वाचून बसेल धक्का

आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप आक्रमक

संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने, आघाडी सरकारने न्यायालयात व्यवस्थित बाजू न मांडल्यामुळे रद्द झालेले आहे. ओबीसी समाजाला शैक्षणिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या संपवण्याचा डाव आघाडी सरकारचा आहे. तरी सरकारने त्वरित मागासवर्गीय आयोग नेमून न्यायालयासमोर बाजू मांडावी व ओबीसीला मोठ्या कष्टाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलेले आरक्षण पुर्वीप्रमाणे द्यावे या आदेशाने दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी दिनी क्रांती चौकात आक्रोश आंदोलन करण्यात आले, अशी माहिती शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी दिली.

क्रांतिचौकात झाले आंदोलन

आरक्षणाच्या मुद्द्यावरून औरंगाबादच्या क्रांतिचौक भागात आंदोलन केले. राज्य सरकार विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता अनेक निर्बंध लावण्यात आले असताना, भाजप कार्यकर्त्यानी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे पोलिसानी कार्यकर्त्यांना अटक करत कारवाई केली. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष, आमदार हरीभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केनेकर, ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस बापू घडामोडे, राजेश मेहता, समीर राजूरकर, शिवाजी दांडगे, सुहास शिरसाठ, श्री.अनिल मकरिये, माधुरी अदवंत, गीता कापुरे, वर्षा साळुंके, दिव्या मराठे, प्रतिभा जऱ्हाड, सौ.दिव्या पाटील, खाजेकर ताई, सविताताई घोडतुरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा - कोरोना संकट : 'आभाळमाया' देणाऱ्या वृद्धाश्रमात मिळतेय जागतिक दर्जाची आरोग्य सुविधा

Last Updated : Jun 3, 2021, 7:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.