ETV Bharat / city

Aurangzeb Grave Controversy : अकबरुद्दीन ओवेसी औरंगजेब कबर भेट; वाचा संजय राऊतांसह कोण काय म्हणाले... - Shiv Sena leader Chandrakant Khaire

हैदराबादमधील आमदार आणि एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवेसी ( MIM leader Akbaruddin Owaisi ) हे औरंगाबादेत शाळेच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी अकबरुद्दीन ओवेसी गुरुवारी आले होते. यावेळी त्यांनी खुलताबाद येथील दर्गां आणि औरंगजेब यांच्या कबरीला भेट ( Akbaruddin Owaisi Visit Dargahs Khultabad ) दिली. मस्जिदीत नमाज देखील अदा केली. तसेच शाळेच्या भूमिपूजन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्यांची जीभ घसरली होती. त्यांनी नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. यावरुन भाजप आणि शिवसेना यांनी त्यांच्यावर टीका केली होती.

Aurangzeb Grave Controversy
एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवेसी
author img

By

Published : May 13, 2022, 11:54 AM IST

Updated : May 13, 2022, 1:26 PM IST

औरंगाबाद - हैदराबादमधील आमदार आणि एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवेसी ( MIM leader Akbaruddin Owaisi ) हे औरंगाबादेत शाळेच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी अकबरुद्दीन ओवेसी गुरुवारी आले होते. यावेळी त्यांनी खुलताबाद येथील दर्गां आणि औरंगजेब यांच्या कबरीला भेट ( Akbaruddin Owaisi Visit Dargahs Khultabad ) दिली. मस्जिदीत नमाज देखील अदा केली. तसेच शाळेच्या भूमिपूजन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्यांची जीभ घसरली होती. त्यांनी नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. यावरुन भाजप आणि शिवसेना यांनी त्यांच्यावर टीका केली होती. तर संजय राऊत हे म्हणाले की, तुम्हालाही एक दिवस त्याच कबरीमध्ये जावे लागेल.

अकबरुद्दीन ओवेसींनी माफी मागावी - एएमआयएम ( AIMIM ) सामाजिक स्वास्थ खराब करत असल्याचा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ( Shiv Sena leader Chandrakant Khaire ) यांनी केला. मुस्लिम लोक देखील औरंगजेबाला ( Aurangzeb Grave Controversy ) मानत नाही. कोणी त्यांच्या कबरीवर जात नाही, आजपर्यंत कोणत्याही मुस्लिम कुटुंबाने आपल्या मुलाचे नाव औरंगजेब ठेवले का? नाही ना, मग एमआयएमच्या नेत्यांना का जायची गरज पडते.आता अकबरुद्दीन ओवेसींनी ( MLA Akbaruddin Owaisi ) माफी मागावी अशी मागणी चंद्रकांत खैरे यांनी केली.

'कबरीवर जाण्यावरून वाद कशाला' : खुलताबाद येथे ऐतिहासिक वारसा असलेल्या दर्गा आहेत. तिथे आम्ही गेलो होतो. त्यावेळी त्यां ठिकाणी असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवर गेलो. आमच्यात कोणाची कबर दिसली की प्रार्थना करण्याची परंपरा आहे. त्याला आम्ही डावलू शकत नाही, त्यावर राजकारण कशासाठी, असा प्रश्न खासदार इम्तियाज जलील ( Imtiaz Jaleel on Chandrakant Khaire ) यांनी उपस्थित केला होता.

या आधी निर्माण झाला होता वाद - औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे हाल करून त्यांची हत्या केली होती. त्यामुळे औरंगजेबाबद्दल राजकीय पक्षांनी आपला द्वेष बोलून दाखवला होता. या आधी देखील अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीला फुल वाहिली होती. त्यावेळी शिवसेना आणि भाजपने टिका केली होती. इतकंच नाही तर एमआयएमला औरंगजेबाची औलाद संभोधण्यात आल होते, तर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ( Shiv Sena leader Chandrakant Khaire ) यांनी रझा काराची औलाद म्हणून हिनवलं होत. आता अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेब कबरीला भेट दिल्याने पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होईल अशी शक्यता नाकारता येत नाही.

अकबरुद्दीन ओवेसी म्हणाले - मी इथे शाळा उघडायला आलोय, जे माझ्या सोबत आहेत, त्या सगळ्यांचे खूप खूप आभार, जी लोक कोविड काळात बेड मिळले नाही म्हणून ऑक्सिजन मिळाले नाही, मृत्यू झाला त्या सगळ्यांबाबत मी दुवा करतो. या देशात सगळ्यात मागासलेले कुणी असेल तर ते मुसलमान आहे. मी आभार मानतो ज्यांनी इम्तियाज जलील याना संसदेत पाठवले. तर दरम्यान, 'श्वान भुकतोय भुंकू द्या, त्यांच्या जाळ्यात अडकू नाका, शांत राहा, जो बोलतोय त्याला बोलू द्या, आपण हसत पुढे जायचे, श्वांनाचे काम भुंकने आहे, वाघाचे काम शांतीत जाणे आहे.' अशी टीका एमआयएम आमदार अकबरुद्दीन ओवेसी ( Akbaruddin Owaisi ) यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता केली आहे.

मी समाजासाठी काम केले - आमच्या मनात सगळ्यासाठी जागा आहे. 2020 च्या सर्वे नुसार 5.5 टक्के मुस्लिम उच्च शिक्षण घेतात. देशात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त उर्दू शाळा महाराष्ट्रात आहेत मात्र त्यांची परिस्थिती फारच खराब आहे. मुस्लिम शिक्षणात मागे आहे. त्याची आकडेवारी देताय. औरंगाबादेत 2021-22 मध्ये 10 वीच्या 8 हजार मुस्लिम मुलांनी शाळा सोडली, परीक्षा नाही दिली, मला कधीच राजकारण करायचे नाही करत नाही. मी ही शाळा उघडली. मला कधी आमदार खासदार व्हायचे नव्हते. मी मेल्यावर अल्लाह विचारेल तुला इतके सगळे दिल तर तू समाजासाठी काय केले तर मी सांगेल होय मी समाजासाठी काम केले.

'घराबाहेर काढल्यांना उत्तर देत नाह' - 'मी कुणाला उत्तर द्यायला आलो नाही, तुमची लायकी नाही की तुम्हाला उत्तर देऊ, माझा तरी एक खासदार आहे. तुम्ही तर बेघर आहेत, तुम्हाला घरातून काढलेले आहे, लवकरच मोठी सभा घेऊन चांगले उत्तर देऊ. अशी टीका एमआयएम आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी केली होती. यावरून आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

तुम्हालाही एक दिवस त्याच कबरीमध्ये जावे लागेल - संजय राऊत यांनी अकबरुद्दीन ओवेसी यांच्या कालच्या भाषणाचा समाचार घेताना त्यांच्यावरही आगापाखड केली आहे. याबाबत ते म्हणाले की, वारंवार औरंगाबादला यायचे, औरंगजेबाच्या कबरी पुढे आम्हाला डीवचंण्यासाठी गुडघे टेकायचे यावरून महाराष्ट्रात अशांतता निर्माण करायची असे ओवेसी बंधूंचे राजकारण दिसत आहे. ज्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या मातीत मराठ्यांनी बांधली आहे. तुम्ही त्या कबरीवर येऊन नमस्कार करता, तुम्हाला एक दिवस त्याच कबरीमध्ये जावे लागेल. असा इशाराही संजय राऊत यांनी अकबरुद्दीन ओवेसी यांना दिला आहे. सविस्तर वाचा...

नितेश राणेंनी ट्वीटकरून केली टीका - अजान आणि हुनमान चालीसावरुन ( Azaan Vs Hanuman Chalisa ) महाराष्ट्रात सध्या राजकारण तापलेले आहे. त्यातच आता ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लमिनचे तेलंगाणातील आमदार आणि नेते अकबरुद्दीन ओवेसी ( AIMIM MLA Akbaruddin Owaisi ) हे औरंगाबाद दौऱ्यावर असताना औरंगजेबच्या कबरीवर जाऊन नतमस्तक झाले. त्यावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. त्याचबरोबर अकबरुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्या भाषणात राज ठाकरे यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. या टीकेला भाजप नेते आमदार नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी ट्विट वरून उत्तर देत आघाडी सरकारवरही निशाणा साधला आहे. सविस्तर वाचा..

हेही वाचा - Akbaruddin Owaisi Visit to Aurangzeb Grave : आमदार अकबरुद्दीन ओवेसीची औरंगजेबाच्या कबरीला भेट, नवा वाद पेटण्याची शक्यता

हेही वाचा - Akbaruddin Owaisi : 'श्वान भुंकतोय भुंकू द्या, उत्तर देऊ नका'; अकबरुद्दीन ओवेसींची जीभ घसरली, म्हणाले...

हेही वाचा - Akbaruddin Owaisi Aurangzeb Grave Controversy : अकबरुद्दीन ओवेसींनी माफी मागावी; चंद्रकांत खैरेंची मागणी

Last Updated : May 13, 2022, 1:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.