औरंगाबाद - हर्सूल कारागृहात नव्याने भरती होणाऱ्या कैद्यांसाठी एसबीओ शाळेमध्ये तात्पुरते जेल उभारण्यात आले आहे. या शाळेची पाहणी करून परिसरात सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
एसबीओ शाळेत कैद्यांसाठी 5 रूमची व्यवस्था
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार विविध उपाय योजना राबवत आहे. याच पार्श्वभूमीवर हर्सूल कारागृहातील कैद्यांना कोरोनाची लागण होऊ नये, यासठी हर्सूल टी पॉईंट परिसरात असणाऱ्या एसबीओ शाळेमध्ये तात्पुरते जेल उभारण्यात आले आहे. या जेलमध्ये कारागृहात नव्याने रवानगी करण्यात आलेल्या कैद्यांना ठेवण्यात येणार आहे. ज्यामुळे बाहेरून येणाऱ्या कैद्यांमुळे कारागृहातील कैद्यांना कोरोनाची लागण होणार नाही. या तात्पुरत्या जेलची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहाणी करण्यात आली आहे. तसेच त्यांनी या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. दरम्यान नव्या कैद्यांसाठी एसबीओ शाळेमध्ये पाच रूम देण्यात आल्या आहेत, त्यातील चार रूम या पुरूष कैद्यासाठी असून, एक रूम महिला कैद्यांसाठी आहे.
हेही वाचा - मुंबईमध्ये तीन दिवस लसीकरण बंद, गर्दी मात्र कायम