औरंगाबाद शिक्षक-पदवीधर आमदारांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या शिक्षकांच्या मोर्च्याला औरंगाबादमध्ये सुरवात झाली आहे. भाजप आमदार प्रशांत बंब (Aurangabad MLA Bamb ) यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी मुख्यालयाच्या ठिकाणी उपस्थित राहण्याचा मुद्दा उपस्थित करत कारवाई करण्याची मागणी केली (teachers march against MLA Bamb) आहे. त्यांच्या याच मागणीच्या विरोधात आणि शिक्षकांच्या सन्मानासाठी औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढण्यात आला असून, त्याची प्रत्यक्षात सुरवात झाली (teachers march at Divisional Commissioners office) आहे.
औरंगाबाद शिक्षकांनी काढलेल्या मोर्च्याला सुरवात मोर्च्यात सहभागी होण्यासाठी आज सकाळपासूनच औरंगाबादसह इतर जिल्ह्यातील शिक्षकांनी शहरात हजेरी (Aurangabad teachers march ) लावली. सकाळी अकरा वाजेपासूनच शहरातील आमखास मैदानात शिक्षकांनी जमण्यास सुरवात केली होती. त्यानंतर आता मोर्चा आमखास मैदानातून विभागीय आयुक्तांच्या कार्यालयाकडे निघाला आहे. यावेळी मोर्चेकरी शिक्षकांनी डोक्यावर वेगवेगळ्या घोषणाबाजी करणाऱ्या टोप्या घातल्या आहेत.
या आहेत मागण्या-
- शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नका.
- सरकारी शाळा भौगोलिक दृष्ट्या सुसज्य करा.
- शासकीय निवासस्थाने बांधून द्या किंवा मुख्यालय राहण्याची अट रद्द करा.
- सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात यावेत.
- विद्यार्थ्यांना उपस्थिती भत्ता वाढवण्यात यावा.
- शिक्षक आणि शिक्षण विभागातील सर्व रिक्त पद भरण्यात यावे.
- 2005 नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन देण्यात यावी.
- वस्तीशाळा शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ देण्यात यावा.
- शिक्षकांबाबतचे अन्यायकारक धोरणे रद्द करा.
शाळांचे खाजगीकरण करण्यासाठी धडपड शिक्षकांनी काढलेल्या मोर्च्याबाबत प्रतिक्रिया देतांना आमदार कपिल पाटील म्हणाले आहेत की, प्रशांत बंब यांनी शिक्षकांच्या प्रश्नात नाक खूपसू नये. त्यांनी स्वतःच्या मतदारसंघाकडे पाहावं. जिल्हा परिषद शाळांचे खाजगीकरण करण्यासाठी हा सगळा घाट असून, त्याचीच ही सुरवात असल्याचा आरोपही कपिल पाटील यांनी केला आहे.
आमदार प्रशांत बंब यांनी केली होती मागणी MLA Bamb Contravesy आमदार प्रशांत बंब यांनी नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात शिक्षक, ग्रामसेवक, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी मुख्यालय रहावे असा प्रश्न उपस्थित केला होता. यासंदर्भात आमदार प्रशांत बंब यांना फोनवरून जाब विचारून अर्वाच्य भाषेत धमकी दिल्याप्रकरणी शिल्लेगाव पोलिसात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शिक्षकांनी प्रशांत बंब यांना विचारला जाब बंब यांनी मुख्यालयी राहण्याचा मुद्दा विधानसभेत मांडला होता. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात गंगापूर खुलताबादचे आमदार प्रशांत बंब यांनी बुधवारी मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी सर्व शिक्षक, ग्रामसेवक, शासकीय, अधिकारी, कर्मचारी यांचे मुख्यालयी वास्तव्य असणे आवश्यक आहे. असा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. अनेक शासकीय कर्मचारी अधिकारी व शिक्षक मुख्यालय न राहता घरभाडी उचलून शासनाची फसवणूक करतात असेही ते म्हणाले होते. त्यावरून अनेक शिक्षकांनी आमदार प्रशांत बंब यांना फोन करून याविषयी जाब विचारला होता.