ETV Bharat / city

Aurangabad University Ink Thrown : औरंगाबादमध्ये राडा! उस्मानाबाद स्वतंत्र विद्यापीठाची मागणी करणाऱ्यांना काळे फासले

author img

By

Published : May 27, 2022, 7:17 PM IST

उस्मानाबादच्या उपकेंद्राला स्वतंत्र विद्यापीठ करण्याची मागणी करण्यात आल्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांच्यावर शाई फेक करण्यात ( Thrown Ink To Senator Demanded Osmanabad University ) आली.

Aurangabad University Ink Thrown
Aurangabad University Ink Thrown

औरंगाबाद - उस्मानाबादच्या उपकेंद्राला स्वतंत्र विद्यापीठ करण्याची मागणी करण्यात आल्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात चांगलाच राडा झाला. रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्याने उस्मानाबाद उपकेंद्राचे व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांच्यावर शाई फेक करुन निषेध व्यक्त ( Thrown Ink To Senator Demanded Osmanabad University ) केला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उस्मानाबाद उपकेंद्र येथे स्वतंत्र विद्यापीठ करण्याच्या मागणीवरून शुक्रवारी वाद झाला. मागणी करणारे व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांच्यावर आज ( 27 मे ) रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम यांनी हा विद्यापीठ विभाजनाचा घाट असल्याचा आरोप करीत व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहाबाहेर शाईफेक केली.

सचिन निकम प्रसारमाध्यमांशी प्रतिक्रिया देताना

विद्यापीठात व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीनंतर निंबाळकर हे इतर सदस्यांसोबत बाहेर येत असताना रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत निषेध केला. त्याचवेळी निंबाळकर यांच्यावर शाईफेक केली. या वेळी निकम आणि निंबाळकर यांच्यामध्ये झटापट देखील झाले.

'जातीयवादी षडयंत्र हाणून पाडण्यासाठी...' - याप्रकरणी बोलताना सचिन निकम म्हणाले की, उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ करणे म्हणजे नामांतर लढ्यात बलिदान देणाऱ्या शहिदांचा अवमान आहे. हा तर राज्यात दंगली पेटवण्याचे जातीयवादी षडयंत्र हाणून पाडण्यासाठी मोठा लढा उभारु. प्रसंगी बलिदान देण्याची आंबेडकरी कार्यकर्त्यांची तयारी आहे. संजय निंबाळकरसारख्या प्रवृत्तींना धडा शिकवून विभाजन हाणून पाडू, असेही निकम यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - Sharad Pawar In Pune : ...म्हणून शरद पवारांनी घेतले दगडूशेठ गणपतीचे बाहेरुन दर्शन

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.