औरंगाबाद - राज्य सरकारने तडकाफडकी औरंगाबाद शहराचे नाव बदलाचा प्रस्ताव मंजूर केला. आणि औरंगाबादचे नाव हे संभाजीनगर ( Aurangabad renamed Sambhajinagar ) केले. यामुळे औरंगाबाद जिल्हा काँग्रेसमध्ये देखील भूकंप झाल्याचे पाहायला ( Aurangabad Renamed Issue ) मिळाले. बुधवारी मध्यरात्री जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शहर अध्यक्ष, शहर प्रवक्ते यांच्यासह तीनशे जणांनी राजीनामा दिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठा संघर्ष पक्षाला करावा लागणार आहे. ( Congress Workers Rising in Aurangabad )
पक्षाच्या अजेंडा विरोधात कृत्य - जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने शिवसेनेला नेहमी विरोध करत संभाजीनगर नामकरणाला विरोध केला. वेळप्रसंगी न्यायालयीन लढाई लढली. 2019 मध्ये सत्तेत समाविष्ट होत असताना शहराच्या नामकरणाचा विषय कुठेही नव्हता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अचानक हा प्रस्ताव आणला. त्यावेळी काँग्रेस पक्षाने त्याला पाठिंबा द्यायला नको होता. मात्र तरी देखील पाठिंबा देण्याचे काम करत पक्षाच्या अजेंडा विरोधात काम केल्याने जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाल्याने राजीनामा स्तर सुरू झाल्याचे पाहायला मिळाले.
तीनशे जणांनी दिला राजीनामा - राज्य सरकारने बुधवारी सायंकाळी निर्णय जाहीर करताच काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष हिशाम उस्मानी आणि शहर प्रवक्ते मोसीन अहमद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर रात्रीतून जिल्ह्यातील जवळपास 300 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष आणि पक्षाकडे आपला राजीनामा पाठवला आहे. पक्षाच्या या भूमिकेमुळे स्थानिक पातळीवर काँग्रेस तोंडावर पडला आहे. आगामी महानगर पालिका निवडणुकीत पक्षाला मानणारे कार्यकर्ते आणि मतदार यांना काय तोंड दाखवायचं असा प्रश्न असल्याने आपण राजीनामा दिला असल्याचे शहर प्रवक्ते मोसीन अहमद यांनी सांगितले.
मंत्रीमंडळ बैठकीत प्रस्तावाला मंजुरी - उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळाची महत्त्वाची बैठक काल सायंकाळी पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्याचे नाव संभाजीनगर ( Aurangabad renamed Sambhajinagar ) आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव ( Dharashiv Naming Of Osmanabad ) करण्याच्या प्रस्तावाला उद्धव ठाकरे यांच्या सरकारने मंजुरी दिली. अनेक वर्षापासून शिवसेनेच्या अजेंड्यावर असलेला हा महत्त्वाचा निर्णय आज अखेर मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. यासोबतच नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव ( Mumbai Airport To Be Name As D B Patils Name ) देण्याच्या निर्णयासही मंजुरी देण्यात आली.