ETV Bharat / city

गरजूंना 'पोलीस कम्युनिटी'चा आधार, हातावर पोट असणाऱ्यांना मदत - aurangabad police

कोरोनाचा विषाणू वाढू नये, यासाठी सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊन मूळे हातावर पोट असलेल्या लोकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडली आहे. अशा नागरिकांसाठी औरंगाबादेत पोलिसांनी मदतीचा हात पुढे केला आहे. कम्युनिटी पोलीसच्या माध्यमातून रोज बाराशे लोकांची भूक भागवण्याचे काम पोलीस करत आहेत.

aurangabad police help to needy people
गरजूंना 'पोलीस कम्युनिटी'चा आधार
author img

By

Published : May 5, 2020, 6:38 PM IST

औरंगाबाद - लॉकडाऊन मूळे हातावर पोट असलेल्या लोकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडली आहे. अशा लोकांसाठी आता औरंगाबादेमध्ये पोलिसांनी मदतीचा हात पुढे केला आहे. औरंगाबाद पोलीस आणि धवल क्रांती रिसर्च आणि डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून झोपडपट्टी भागांमध्ये जेवण देण्याचे काम होत आहे. त्यासोबत सॅनिटायझर, साबण आणि काही प्रमाणात धान्य देखील गरजवंतांना दिले जात आहे. या मदतीने अनेक गोर गरिबांचा जेवणाचा प्रश्न सुटला आहे.

औरंगाबादमध्ये गरजूंना गरजूंना 'पोलीस कम्युनिटी'चा आधार...

हेही वाचा... ईटीव्ही भारत विशेष : विघ्नहर्त्यावर कोरोनाचे विघ्न !

पोलीस म्हटले की, डोळ्या समोर उभे राहतात ते गुन्हेगारांवर कारवाई करणारे किंवा रस्त्यावर नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करणारे खाकी वर्दीततील पोलीस. यातूनच अनेक वेळा चिडलेले काही लोक याच पोलिसांना शिव्याशाप देखील देतात. मात्र, कायदा पाळायला सांगणाऱ्या या पोलिसांमध्ये मदत करणारे देखील पोलीस असतात. जे आपल्याला अनेक अडचणींमधून बाहेर काढतात. अशा पोलिसांमधील माणुसकीचे दर्शन औरंगाबादेत मात्र अनेकांना दररोज होत आहे.

कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून दररोज सकाळी वीटभट्टी, गरीब वस्तीत जिथे दररोज पैसे मिळाले तरच घरात चूल पेटते, अशा लोकांसाठी तयार जेवण पुरवण्याचे काम केले जात आहे. सकाळी पोलीस व्हॅनमध्ये तयार केलेली पोळी भाजी पॅकिंग स्वरूपात आणली जाते. पोलीस कर्मचारी परिसरातील नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगनुसार रांगेत उभे करतात. पोलीस कम्युनिटीच्या माध्यमातून सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि धवल क्रांती रिसर्च आणि डेव्हलपर्सचे डॉ किशोर उढाण यांचा उपस्थितीत भोजन वितरित केले जाते.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या संकल्पेनुत पोलीस कम्युनिटीच्या माध्यमातून गरजूंना अन्न पोहचवण्याचे काम सुरु आहे. जवळपास 7,443 धान्याचे किट, 2 लाख 94 हजार साबण, 15 हजार मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली. तर सकाळी जेवण आणि दुुपारनंतर धान्याचे किट पोहचवले जात आहेत. ज्या ठिकाणी पूर्ण भाग कोरोनामुळे सील केले आहे, अशा भागातील लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत केला जात आहे. लॉकडाऊन संपेपर्यंत ही मदत केली जाईल, अशी माहिती धवल क्रांती रिसर्च आणि डेव्हलपर्सचे डॉ. किशोर उढाण यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.