ETV Bharat / city

फक्त ग्रीन फटाके विका; औरंगाबादच्या फटाका विक्रेत्यांना दिवाळीच्या एक दिवस नोटीस - औरंगाबादमध्ये फटाके विक्रीस बंदी

औरंगाबाद शहरात ग्रीन फटाक्यां व्यतिरिक्त इतर फटाके विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, हा निर्णय ऐन दिवाळीच्या आधी घेण्यात आल्याने फटाका विक्रेते आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या 30 नोव्हेंबर पर्यंत फटाक्यांची विक्री आणि फटाके वाजवण्यास बंदी असून नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आकारण्यात येणार आहे.

दिवाळीच्या एक दिवस आधी व्यापाऱ्यांना नोटीस

author img

By

Published : Nov 13, 2020, 8:47 PM IST

औरंगाबाद - ऐन दिवाळीच्या एक दिवस आधी, पोलीस आयुक्तांनी फटका व्यापाऱ्यांना इको फ्रेंडली फटाकेच विकता येतील, अशी नोटीस बजावली आहे. त्यामुळे फटाका विक्रेते आणि व्यापाऱ्यांनी यापूर्वीच सर्वच प्रकारच्या खरेदी केलेल्या फटाक्यांचे करायचे काय? असा प्रश्न आता व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे व्यावसायिकांवर ऐन दिवाळीत संक्रात कोसळणार आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद फटका बाजारातील आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी....

कोरोना संसर्ग वाढण्याची भीती लक्षात घेता, राष्ट्रीय हरित लवादाने काही शहरांमध्ये फटाके उडवण्यास बंदी घालण्याच्या सूचना दिल्या. त्यामध्ये मुंबई-पुणे या शहरांसह औरंगाबाद शहराचा देखील समावेश आहे. येत्या 30 नोव्हेंबर पर्यंत फटाक्यांची विक्री आणि फटाके वाजवण्यास बंदी असून नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आकारण्याचा प्रयोजन यात आहे, असे निर्देश लवादाने ऐन दिवाळीच्या आधी दिल्याने फटका व्यापारी संतप्त झाले आहेत.

एक वर्ष आधी फटाक्यांची करावी लागते खरेदी-

ऐन दिवाळीच्या एक दिवस आधी फटका व्यापाऱ्यांना नोटीस बजावली असल्याने व्यापारी संतप्त आहेत. फटाक्यांची दुकान सुरू करण्यासाठी एक वर्ष ते सहा महिने आधी फटाके आरक्षित करावी लागतात. तामिळनाडू येथील शिवकाशी येथून फटाके मागवावी लागतात. त्यामुळे बंदी घालण्याची होती तर काही महिने आधी ती घातली असती तर काही करता आले असत. मात्र आज फटाक्यांची दुकाने थाटली गेली आहेत. ग्राहक दुकानात येत आहेत. आणि ऐनवेळी ही बंदी घातली. व्यापाऱ्यांना होणारे नुकसान कोण भरून देणार? असा प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

दोन दिवस आधी झाली होती जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक-

राष्ट्रीय हरित लवादाने निर्देश दिल्यानंतर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त आणि व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी फटाका व्यापाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. सध्या औरंगाबादेत फटका दुकान लावलेले आहेत. ग्राहक हळूहळू फटाका दुकानांकडे येऊ लागलाय. अशावेळी अचानक ही बंदी कशी घालता येईल? असा प्रश्न व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला विचारला होता. त्यावेळी काहीतरी मार्ग यातून काढा, अशी मागणी देखील व्यापाऱ्यांनी केली होती.

अशा प्रकारचे निर्णय हे काही महिने आधी जाहीर करायला हवे होते. त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही, मात्र आज ऐनवेळी निर्णय घेतल्याने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. फटाका बंदी करण्यास आमची मनाई नाही. मात्र हा निर्णय घेत असताना फार उशीर झाला आहे. त्यामुळे हा निर्णय यावर्षी लागू न करता, पुढच्या वर्षी करावा आणि तशा सूचना व्यापाऱ्यांना द्याव्या. म्हणजे त्या अनुषंगाने फटाक्यांची खरेदी करायची का नाही, याबाबत व्यापारी निर्णय घेऊ शकतात, अशी भूमिका फटाका व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना समोर मांडली. मात्र त्यावेळी कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. दिवाळीला आता एक दिवस शिल्लक आहे आणि त्यावेळेस मात्र अचानक पोलीस आयुक्त कार्यालयातर्फे फटाका व्यापाऱ्यांना नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार फक्त इको फ्रेंडली फटाके विकता येतील असं त्यामध्ये नमूद केले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मिटिंग झाल्यानंतर ही दोन दिवस कुठलीही भूमिका का जाहीर केले नाही? असा संतप्त प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

यावर्षी फटका विक्रीत 60 टक्के घट होण्याची शक्यता-

यावर्षी फटाका यापारावर देखील कोरोना सावट आहे. त्यामुळे जवळपास फटाक्यांच्या विक्रीमध्ये 60 टक्‍क्‍यांनी घट होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी यंदा फटाक्यांची खरेदी कमी प्रमाणात केल्याची माहिती औरंगाबाद फटका असोसिएशनचे अध्यक्ष गोपाळ कुलकर्णी यांनी दिली. आधीच कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे फटाक्यांची विक्री कमी होणार हे अपेक्षित आहे. त्यामुळे दरवर्षी एका बाजारात किमान दहा ट्रक फटाक्यांचा माल उतरवला जातो. मात्र यावर्षी तीन ते चार ट्रक फटाके मागवण्यात आले आहेत. कोरोनामुळे आधीच व्यापारी हा अडचणीत सापडला आहे. त्यात फटाक्यांची विक्री देखील कमी होणार आहे आणि अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासन किंवा हरित लवादाने ज्या पद्धतीने फटाक्यांवर निर्बंध लावले. त्यामुळे व्यापाऱ्यांचे पुन्हा नुकसान होणार आहे. फटका व्यापारी आत्महत्या करू शकतो. त्यामुळे असे निर्णय हे लवकर जाहीर केले तर निश्चितच व्यापाऱ्यांना नुकसान होणार नाही अशी भावना गोपाळ कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.