औरंगाबाद - राज्यातील बहुचर्चित 30 - 30 घोटाळ्यातील मास्टरमाईंड असलेला संतोष राठोडला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी रात्री दुसऱ्या तक्रारदाराने तक्रार देताच, शनिवारी मध्यरात्री ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
असा आहे तिथेच घोटाळा
डीएमआयसी, समृद्धी महामार्ग तसेच धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीन, चिकलठाणा, करमाड आणि कन्नड या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. शासनाने या शेतकऱ्यांना कोट्यावधी मध्ये मोबदला दिला आहे. अशा शेतकऱ्यांना गाठून त्यांच्याकडून सचिन उर्फ संतोष राठोड याच्यासह त्याच्या साथीदारांनी 25 ते 30 टक्के व्याजाचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवणूक करायला लावले. सुरुवातीला शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला मात्र तो मोबदला मागील एक वर्षापासून देणे बंद करण्यात आले. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे पैसे या 30 - 30 घोटाळ्यांमध्ये अडकून गेले.
Aurangabad Crime : अनेक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी संतोष राठोडला अटकेत - समृद्धी महामार्ग
राज्याने मोबदला दिलेल्या शेतकऱ्यांना गाठून त्यांच्याकडून सचिन उर्फ संतोष राठोड याच्यासह त्याच्या साथीदारांनी 25 ते 30 टक्के व्याजाचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवणूक करायला लावले. औरंगाबाद पोलीसांनी संतोष राठोडला ( Aurangabad police arrested santosh rathod ) अखेर पोलिसांनी अटक केली आहे.