ETV Bharat / city

Aurangabad lawyer : जगण्यासाठी वकिलाची जिद्द! शरीर निकामी झालं असताना शोधला जगण्याचा मार्ग- उदय चव्हाण - रायगड पर्यटन

जगण्यासाठी वकिलाची जिद्द! ज्ञान, हिंमत आणि जिद्द असली, तर अडचणीतून मार्ग निघत असतो, याचा प्रत्यय एका वकिलाने ( lawyer ) दाखवला आहे. पिसादेवी भागात राहणाऱ्या वकिलाने 95 टक्के शरीर अपघातात ( accident ) निकामी झाले आहे.

जगण्यासाठी वकिलाची जिद्द
जगण्यासाठी वकिलाची जिद्द
author img

By

Published : Jul 20, 2022, 11:42 AM IST

औरंगाबाद - ज्ञान कधी वाया जात नाही असे म्हणतात. ज्ञान, हिंमत आणि जिद्द असली, तर अडचणीतून मार्ग निघत असतो, याचा प्रत्यय एका वकिलाने ( lawyer ) दाखवला आहे. पिसादेवी भागात राहणाऱ्या वकिलाने 95 टक्के शरीर अपघातात ( accident ) निकामी झाले आहे. सर्व अवयवांची काम करणे बंद केले असताना फक्त बोलण्याची शक्ती आणि विचार करणारा मेंदू मात्र सुरू होता. कुटुंबाचा गाडा ( Family Problem ) हाकने अवघड झाले असताना त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानामुळे त्यांना मार्ग सापडला आहे. मुलांना शिकवणी देत त्यांनी कुटुंबाला उभारी देण्याचे काम सुरू केले आहे.

जगण्यासाठी वकिलाची जिद्द

अपघातात शरीर झालं निकामी - पेशाने वकील असलेल्या उदय चव्हाण यांना गड- किल्ले फिरण्याची आवड आहे. पुण्यामध्ये न्यायालयात ते आपला सराव करत होते. फेब्रुवारी 2019 मध्ये आपल्या कुटुंबियांसोबत रायगड पर्यटन ( Raigad Tourism ) करून जात असताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या लहान मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. गाडीतील कुटुंबातील सर्व सदस्य जखमी झाले होते. त्यांना जबर मार लागल्याने, गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्या मणक्यांना जबर मार बसल्याने शरीराचे सर्व अवयवांची काम करणे बंद केले आहे. हात पाय निकामी झाले. प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यांना फक्त बोलता येत होते. मुलगी गेल्याने मनावर झालेला आघात त्यात शरीरावर झालेल्या वेदनामुळे सर्व संपल अस वाटत होतं. कुटुंबाचा गाडा हाकायचा कसा असा प्रश्न पडला होता. मात्र, सुरुवातीला मित्रांनी साथ दिल्याने बळ मिळाले, अशी भावना ऍड.उदय चव्हाण यांनी व्यक्त केली.

मित्रांनी दिली साथ - 2019 मध्ये उदय चव्हाण यांचा अपघात झाल्यावर त्यांना आपल्या मणक्याची तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली. पुण्यातील नामवंत तज्ञ डॉक्टरांकडे ही शस्त्रक्रिया करण्याचं ठरलं. त्यावेळी उदय यांच्या मित्रांनी मोलाची साथ दिली. शस्त्रक्रियेसाठी लागणार खर्च त्यांनी उभा केला. इतकंच नाही, तर पुढील काही दिवस कुटुंबाला आर्थिक टंचाई भासू नये. यासाठी मदत उभी केली. ओढवलेल्या परिस्थितीमुळे उदय चव्हाण यांनी पुणे सोडलं आणि औरंगाबादला स्वतः च्या घरी परतले.

ज्ञानामुळे मिळाला आधार - उदय चव्हाण कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं. मात्र, इंग्रजी भाषेवर त्यांचं प्रभूत्व नव्हतं. त्यामुळे त्यांना पदोपदी अडचणींचा सामना करावा लागायचा. मात्र त्यावर मात करत त्यांनी पुण्याला हालकीच्या परिस्थितीत राहून इंग्रजी शिकण्यासाठी शिकवणी लावली. काही महिन्यात त्यांनी उत्तम इंग्रजी शिकली. कालांतराने त्यांनी ज्या संस्थेत इंग्रजी शिकली. त्याठिकाणी त्यांना अर्धवेळ मुलांना इंग्रजी शिकवण्याची संधी मिळाली. तेच ज्ञान त्यांना आता कामी आले आहे. पुण्याला मणक्याची शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यावर 1-2 वर्षात प्रकृतीत सुधारणा होईल असं डॉक्टरांनी सांगितल. मात्र तस झाली नाही. जागेवरून हलता देखील येत नाही. त्यात एकट्याच्या जीवावर असलेला संसाराचा गाडा हाकायचा कसा ? असा प्रश्न असताना त्यांनी घरीच मुलांना शिकवणीची तयारी दर्शवली. सुरुवातीला त्यांनी काही विद्यार्थ्यांना मोफत शिकवले सुद्धा होते. मात्र काही दिवसात परिसरातील नागरिकांनी त्यांच्या शिकवणीसाठी त्यांना पैसे दिले. आणि तिथूनच त्यांच्या नव्या प्रवासाला सुरुवात झाली. आज 26 विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. तर 20 विद्याथी ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून शिक्षण घेत आहेत, अशी माहिती उदय चव्हाण यांनी दिली.

पत्नीची मिळाली उत्तम साथ - ऑनलाइन अभ्यास घ्यायचा. मात्र हात- पाय निकामी असल्याने ते कसं पूर्ण करावं असा प्रश्न होता. मात्र त्यांची पत्नी नम्रता यांनी त्यांना उत्तम साथ दिली. रोज त्यांच्या शिकवणीचा वेळी. मोबाईल लावून देणे, त्यांना हवी- तशी मदत देणे, हे काम त्यांनी केले आहे. 2019 मध्ये पुणे सोडून औरंगाबादला आल्यावर घराचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी कपडण्याची दुकान टाकली. मात्र, कोरोनामुळे लागलेल्या निर्बंधांमुळे दुकान बंद पडली. त्या काळात उदय यांच्या शिक्षणाचा फायदा झाला. मात्र, वाढती महागाई मुलीचे शिक्षण यामुळे अर्थव्यवस्था कोलमडली. गृहिणीच्या हातात अन्नपूर्णा असते अस म्हणतात. 4 महिन्यांपूर्वी त्यांच्या पत्नीने पुन्हा नव्याने व्यवसायाला सुरुवात केली. कपड्याच्या दुकान सोबत पाणीपुरी, दाबेली, भेळ विकायला सुरुवात केली. पिसादेवी परिसरात त्यांच्या खाद्य पदार्थाना चांगलीच मागणी मिळाली. उदय यांच्या खांद्याला खांदा लावून नम्रता चव्हाण सोबत उभ्या राहिल्या. त्यामुळे कठीण परिस्थितीत देखील जगण्याची नवी उमेद उदय चव्हाण यांना मिळाली. शिक्षण कधीही वाया जात नाही, त्यामुळे शिक्षण घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा. यश मिळेलच अस मत उदय चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा - Lok Sabha Speaker Approves Shinde Group : लोकसभा अध्यक्षांची शिंदे गटाला मान्यता; उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.