ETV Bharat / city

Aurangabad Kranti Chowk Flyover Crack : क्रांती चौक उड्डाणपुलाला तडा, पूल धोकादायक होण्याची शक्यता!

क्रांती चौक येथील उड्डाणपूल हा सुरुवातीपासून वादाचा विषय राहिला. निर्मिती पासूनच अनेक अडचणी आल्या. त्याच्या रचनेपासून अनेक प्रश्न पुलाबाबत उपस्थित केले गेले. त्यात पुलाच्या संरक्षण कठड्यासह रस्त्याला सहा इंच इतकी फट पडल्याची ( Aurangabad Kranti Chowk Flyover Crack ) धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Aurangabad Kranti Chowk Flyover Crack
क्रांती चौक उड्डाणपुलाला तडा
author img

By

Published : Jan 5, 2022, 12:18 PM IST

औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाने बांधलेला क्रांती चौकातील उड्डाणपूल धोकादायक झाला का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुलाचे काम पूर्ण होऊन दहा वर्षे झाली आहेत मात्र त्यावर एका ठिकाणी फट पडल्याचे समोर ( Aurangabad Kranti Chowk Flyover Crack ) आले आहे.

क्रांती चौक उड्डाणपुलाला तडा

पुलावर सहा इंच इतका पडला तडा -

क्रांती चौक येथील उड्डाणपूल हा सुरुवातीपासून वादाचा विषय राहिला. निर्मिती पासूनच अनेक अडचणी आल्या. त्याच्या रचनेपासून अनेक प्रश्न पुलाबाबत उपस्थित केले गेले. त्यात पुलाच्या संरक्षण कठड्यासह रस्त्याला सहा इंच इतकी फट पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुलाचे पिलर्स बेअरिंग तंत्रज्ञानावर आधारित असून पुलावरील सरफेसवर गॅप एवढा मोठा आहे की, खालून पाहिले तर, वरून जाणारी वाहने त्यातून दिसतात. पुलाचे बेअरिंग अलायमेंट सरकले की, काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

पुलावरून रोज जातात हजारो वाहन -

शहरातील मुख्य रस्ता असलेल्या जालना रस्त्यावर क्रांती चौक उड्डाणपूल असून रोज हजारो वाहनांची वर्दळ पुलावरून असते. पुलावर पडलेल्या फटीतून पुला खालून जाणारी वाहन दिसत आहेत. त्यामुळे अवघ्या दहा वर्षांमध्ये पूल धोकादायक झाला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अशी झाली होती पुलाची निर्मिती -

क्रांती चौकातील उड्डाणपुलाच्या आराखड्याला 2006 च्या सुमारास मनपाच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. त्यानंतर फेब्रुवारी 2009 मध्ये पुलाचे काम सुरू झाले. पुलाच्या रचनेमुळे वाद निर्माण झाल्याने काम सुरू होण्यास उशीर झाला. काम सुरू झाल्यावर 2011 मध्ये पुलाच्या दोन पिलर्सला तडे गेल्याचे समोर आल्याने पुलाच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले. तिथे नवीन पिलर्स उभे करावे लागले. त्याच पिल्लरवरील पुलाच्या वरील वाजूस फट पडल्याने पुन्हा कामावर प्रश्न उपस्थित झाले असून तातडीने याबाबत अहवाल तयार करून दुरुस्ती करावी अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचा - Women Struggle For Water In Nashik District : आदिवासी भागातील महिलांचा पाण्यासाठी संघर्ष; पहा ही जीवघेणी कसरत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.