औरंगाबाद - Aurangabad Water Problem: शहराला पाणीपुरवठा करणारी नवीन योजना मंजूर ( new water supply scheme approved Aurangabad ) झाली असून, त्यासाठी केंद्राकडून मदत दिली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड ( Union Minister of State for Finance Dr Bhagwat Karad ) यांनी केली. आधी ही योजना फक्त राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण केली जात होती. मात्र त्यासाठी आता केंद्रही मदत करणार असून 2024 पर्यंत ही योजना पूर्ण होऊन शहरवासीयांना मुबलक पाणी ( Water problem of Aurangabad ) मिळेल असा आश्वासन देखील डॉक्टर कराड यांनी दिलं.
महाविकास आघाडी सरकारमुळे योजना रखडली.. युती सरकारच्या काळात शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरासाठी नवी योजना जाहीर केली होती. त्यानुसार 1680 कोटी रुपये खर्च करून शहरवासीयांना मुबलक पाणी देण्यात येणार होते. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं. कामाला कुठेतरी मंदपणा ( plan stalled Mahavikas Aghadi government ) आला. त्यावेळेस ही योजना केंद्र सरकारकडे पाठवा अशी मागणी केली होती. मात्र, त्यांनी ते केलं नव्हतं. मात्र, आता शिंदे सरकार आल्यावर केंद्राकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यानुसार आता 2 हजार 714 कोटींची योजना केंद्राच्या अमृत 2 मधून मंजूर झाली आहे. त्यात केंद्र आपला वाटा देईल अशी माहिती डॉ भागवत कराड यांनी दिली.
सर्वांना मिळेल मुबलक पाणी...केंद्र सरकार काही शहरांची निवड करत असतं ज्यामध्ये मुबलक पाणी देण्यासाठी योजना मंजूर केल्या जातात. 80 शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यात औरंगाबादचा देखील समावेश आहे. त्यानुसार आता शहरवासीयांना पाणी देण्यासाठी केंद्राने मंजूरी दिली आहे. पैठणून पाईपलाईन टाकण्याचे काम संत गतीने सुरू होते, मात्र आता त्याला गती मिळाली आहे. आतापर्यंत 2.8 किलोमीटर इतके पाईप टाकून झाले, असून पुढील आठ किलोमीटरचे पाईप सध्या आलेले आहेत. उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल 2024 पर्यंत शहराच्या नागरिकांना नियमित आणि पुरेसं पाणी मिळेल असा आश्वासन डॉक्टर कराड यांनी दिलं.