ETV Bharat / city

कारला धक्का लागल्याने पोलीस निरीक्षकाची सटकली, तरुणाला मारहाण करत शिवीगाळ - police inspector beaten news

पोलीस निरीक्षकाच्या कारला धक्का लागल्याने त्याने रिक्षाचालकाला भररस्त्यात शिवीगाळ केली.

aurangabad news
पोलीस निरीक्षकाने केली तरुणाला मारहाण
author img

By

Published : Aug 7, 2021, 9:59 PM IST

औरंगाबाद - आझाद चौक परिसरातून जाणाऱ्या पोलीस निरीक्षकाच्या कारला लोडिंग रिक्षाचा धक्का लागला. या कारणावरून पोलीस निरीक्षकाने रिक्षाचालक तरुणाला कानशिलात लगावत, शिवीगाळ केल्याची घटना शनिवारी (ता.7) सकाळी घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शहरातील वर्दळीच्या असलेल्या आझाद चौक परिसरातून सहायक पोलीस निरीक्षक राजेश मायेकर हे चारचाकीने जात होते. यावेळी एक लोडिंग रिक्षाचालकाने त्यांच्या चारचाकी वाहनाला धक्का दिला. यामुळे संतापलेल्या पोलीस निरीक्षकाने रस्त्यात वाहन थांबवत, रिक्षाचालकाची चावी काढून घेतली. यावेळी पोलीस निरीक्षकाने तरुणाला भररस्त्यात शिवीगाळ केली. यावेळी तरुण विनंती करत असताना, निरीक्षक मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. यामुळे बराच वेळ रस्त्यात हा गोंधळ सुरू होता.

घटनेचा व्हिडिओ व्हायरल -

दरम्यान, उपस्थितांनी या घटनेचा व्हिडिओ शूट केला. पोलीस निरीक्षकाने शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत.

हेही वाचा - विचारांचं ट्रोलिंग बंद करुन समाजाला एकत्र यावं लागेल - देवेंद्र फडणवीस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.