औरंगाबाद - गंगापूर तालुक्यातील तीनशे दोन आशा सेविकांचे कोरोना काळातील पाच महिन्यांचे 78 लाख 50,000 हजार रुपयांचे वाढीव मानधन थकीत असून हातावर प्रपंच असणाऱ्या आशा सेविकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आशा सेविकांना मानधन लवकरात लवकर मिळावे, अशी मागणी तालुक्यातील आशा कार्यकर्त्यांकडून होत आहे.
गेल्या दीड वर्षांपासून कोरोना काळात घरोघर जाऊन प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण आशासेविका करत आहेत. तसेच आपल्या कुटुंबांची काळजी घेत आहेत. नागरिकांच्या आरोग्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनाशी लढत आहेत. दीड वर्षात अनेक कुटुंबात आशासेविका विविध कारणांसाठी जात आहेत. नागरिकांना होणाऱ्या आजारांची माहिती घेणे, कोरोना बाधित व त्याच्या कुटुंबातील सदस्याची यादी करणे, लसीकरणाची माहिती घेणे गावातील नागरिकांना त्यासाठी प्रोत्साहीत करणे या कामांचा त्यात समावेश होतो. आशा सेविकांना एवढे करूनही आरोग्य विभागाकडून मास्क, सँनिटायझर, ग्लोव्हज असे साहित्य दिले जात नाही. आशा सेविका मात्र, तालुका अरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे व संबधीत पाच महिन्यापासून मानधनापासून वंचित आहेत. तालुक्यातील 302 आशा सेविकांचे 78 लाख 50,000 हजार रुपये येवढे मानधन थकले आहे. त्यामुळे समाजाच्या सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा - जगप्रसिद्ध अजिंठा लेणीची शापित कहानी