औरंगाबाद इलाहाबाद न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबाबत विपर्यास केला जात असल्याचा दावा आर्य समाज मंदिर तर्फे करण्यात आला आहे. आर्य समाज मंदिरचं नव्हे, तर कुठल्याही पद्धतीच्या विवाहाची नोंद शासन दरबारी करावी लागते. अन्यथा ते कायदेशीर रित्या ग्राह्य धरले जात नाहीत. त्यामुळे आर्य समाज मंदिराबाबत होणाऱ्या चर्चा चुकीच्या आहेत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच विवाह केले जातात. अशी माहिती आर्य समाज मंदिराचे कायदे तज्ज्ञ ऍड. जोगेंद्रसिंह चौहान यांनी दिली.
इलाहाबाद न्यायालयाने दिला निर्णय इलाहाबाद न्यायालयात दाखल एका याचिकेबाबत सुनावणी सुरू असताना, याचिकाकर्त्याने आपल्या पत्नीचे अपहरण झाल्याचं सांगत, महिलेशी विवाह झाल्याबाबत आर्य समाज मंदिरात विवाह झाल्याचे नोंदणी प्रमाणपत्र, आणि काही छायाचित्र सादर केले. त्यावर आर्य समाज येथे मिळालेले प्रमाणपत्र हा विवाहाचा एकमेव पुरावा ग्राह्य धरता येणार नाही, असे प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणात मिळतील अस मत कोर्टाने नोंदवले आहे. त्यावरून आर्य समाज मंदिरात लावण्यात येणाऱ्या विवाहांबाबत प्रश्न उपस्थितीत करण्यात येत आहेत.
निर्णयाचा विपर्यास
इलाहाबाद न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबाबत विपर्यास केला जात असल्याचा दावा आर्य समाज मंदिर तर्फे करण्यात आला आहे. आर्य समाज मंदिर नव्हे तर कुठल्याही पद्धतीचे विवाहाची नोंद शासन दरबारी करावी लागते. अन्यथा ते कायदेशीर ग्राह्य धरले जात नाहीत. त्यामुळे आर्य समाज मंदिर बाबत होणाऱ्या चर्चा चुकीच्या आहेत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच विवाह केले जातात अशी माहिती आर्य समाज मंदिर कायदे तज्ज्ञ ऍड जोगेंद्रसिंह चौहान यांनी दिली.
असे होतात आर्य समाज मंदिरात विवाह आर्य समाज मंदिरात विवाह करण्यासाठी नियम लावण्यात आले आहेत. त्यानुसार वधू - वर सज्ञान असायला हवेत. त्यांच्या वयाचा दाखला असणे आवश्यक आहे. त्यामध्ये आधार कार्ड अथवा शाळा सोडण्याचा दाखला घेतला जातो. त्यानंतर दोघांकडूनही प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाते. विवाह करताना दोन्हीही बाजूचे दोन साक्षीदार घेतले जातात. प्रतिज्ञापत्र नोटरी करून आणला जाते आणि त्यानंतरच विवाह केला जातो. कायदेशीर रित्या प्रक्रिया पूर्ण करूनच विवाह केले जातात. त्यामुळे आर्य समाज मंदिरात होणारी विवाह चुकीच्या पद्धतीने लावले जातात असा दावा करणे चुकीचा असल्याचा मत आर्य समाज मंदिर कायदेतज्ञ ऍड जोगेंद्रसिंग चौहान यांनी व्यक्त केलं आहे.