औरंगाबाद - एकीकडे आरेमध्ये वृक्षतोड झाल्यावर शिवसेनेने याचा विरोध केला, आणि सत्तेत येताच त्याला स्थगितीसुद्धा दिली. मात्र, आरेसारखा काहीसा प्रकार औरंगाबादेत सुद्धा सुरू आहे. तोही बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी औरंगाबादच्या प्रियदर्शनी उद्यानातील झाडे तोडण्यात येणार आहेत. त्यावरून माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सोशल मिडियावर याबाबत टिका केली आहे.
औरंगाबादच्या प्रियदर्शनी उद्यानात उभारल्या जाणाऱ्या स्मारकासाठी एकूण खर्च 64 कोटी, उद्यानाचा परिसर 17 एकर, पुतळ्याची जागा 1135 स्केवर मीटर, फुड पार्कसाठी जागा 2330 स्केवर मीटर, म्युझियमसाठी जागा 2600 स्केवर मीटर अस प्रस्तावित आहे. यासाठी शेकडो झाडांची कत्तल केली जाणार असल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांनी केला आहे.
औरंगाबादच्य सिडको भागात असलेल्या प्रियदर्शनी उद्यानात 1 हजारावर झाडे आहेत. त्यामुळे हे उद्यान म्हणजे जणू घनदाट जंगलंच आहे. परिसरातील अनेक लोक याठिकाण रोज फिरायला येतात. 17 एकर परिसरात हे उद्यान पसरले आहे. शहरातील लोकांसाठी हे स्वच्छ हवेचे मोठे केंद्र आहे. याठिकाणी 70 प्रजातींचे पक्षी. 50 वर प्रकाराची फुलपाखर, अनेक छोटे मोठे प्राणी, उंच झाडे अस्तित्वात आहे. मात्र, हे सर्व नष्ट करूण तिथे दिवंगत बाळासाहेब ठाकरे याचे स्मारक उभारले जाणार असल्याचा आरोप निसर्गप्रेमींनी केला आहे. यासाठी महापालिका म्हणते की, काही झाडे तोडावी लागतील.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी नियोजीत प्रस्ताव -
- प्रकल्पाचा एकूण खर्च 64 कोटी
-
उद्यानाचा परिसर 17 एकर
-
पुतळ्याची जागा 1135 स्केवर मीटर
-
फुड पार्कसाठी जागा 2330 स्केवर मीटर
-
म्युझियमसाठी जागा 2600 स्केवर मीटर
-
ओपन एअर एन्जॉयमेन्ट जागा 3690 स्केवर मीटर
आता इतक्या सगळ्या बांधकामसाठ किती झाडे तोडावी लागणार हा प्रश्न आहे. 2017 ला महापालिकेने या स्मारकाचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून हा विरोध सुरुच आहे. आता हा वाद कोर्टात गेला आहे. आरेला झालेली वृक्षतोड आणि त्यानंतर शिवेसेनेने घेतलेली भूमिका याचे कौतुक झाले. आता उद्धव ठाकरे स्वत: लक्ष घालून ही औरंगाबादमधील झाडांची कत्तल थांबवणार का? हाच खरा प्रश्न आहे. मात्र, झाडे तोडण्याचा कुठलाही विचार नसून झाडे न तोडता स्मारक कस उभ करता येईल याबाबत विचार सुरू असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.