औरंगाबाद - महाराष्ट्रामध्ये वाढती गुन्हेगारी व महिलांवरील अन्याय व अत्याचाराच्या वाढत्या घटनांविरोधात भाजप महिला मोर्चातर्फे गजानन महाराज मंदिर चौकात आंदोलन करण्यात आले. आंदोलक महिलांना जवाहर नगर पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली.
बलात्कारातील पीडितेचा मुंबई साकीनाका परिसरात शनिवारी मृत्यू झाला. त्यामुळे भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्यावतीने महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली. औरंगाबादच्या गजानन महाराज मंदिरासमोरील, गणपती बाप्पा समोर सरकारला सुबुद्धी दे, महिलांना न्याय दे, म्हणुन साकडे घातले. शहरातील भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी तीव्र निदर्शने केली. महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध करत महिला कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.
हेही वाचा-विधानसभा निवडणुकीच्या 15 महिने अगोदर विजय रुपाणी यांची गच्छंती कशामुळे?
राजकीय दबावापोटी महिलांवरील अन्याय करणाऱ्या आरोपींना खुली सूट दिली जाते. हे अतिशय निंदनीय आहे, अशा शब्दात भाजप महिला मोर्चाच्या महिलांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या.
आंदोलनाला हे पदाधिकारी होते उपस्थित-
हेही वाचा-Saki Naka Rape Case: बलात्कार प्रकरणात एकच आरोपी, नराधमाला 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
आंदोलनाला महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस सविता कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्ष माधुरी अदवंत, महिला मोर्चा शहराध्यक्ष अमृता पालोदकर, शहर उपाध्यक्ष मनिषा मुंडे, वर्षा साळुंखे, गीता कापुरे, सुनंदा निकम, प्रतिभा जऱ्हाड, शालिनीताई बुंदे, लता सरदार, शिवगंगा जायभाये, सुवर्णा तुपे, दिव्या पाटील, वंदना शहा यांनी भाजप महिला कार्यकर्त्यानी सहभाग घेतला. आंदोलक महिला पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन जवाहर नगर पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केले. त्यानंतर सोडून दिले.
हेही वाचा-साकीनाका येथील बलात्काराची घटना दुर्दैव - महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सतत आंदोलन करणार-
महिलांच्या विषयात महाविकास आघाडी सरकार वेळकाढू भुमिका घेते. त्यामुळे राज्यामध्ये अनेक शासकीय व शैक्षणिक संस्थांमध्ये महिलांचे लैंगिक शोषण उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडून केले जाते. हे अतिशय निंदनीय आहे. त्याविरोधात भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा सतत आंदोलन करणार, अशी भूमिका यावेळी भाजप महिला मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष माधुरी अदवंत यांनी घेतली.