औरंगाबाद - कोट्यवधींचा खर्च करून अत्याधुनिक ऑरिक सिटी ( Auric City Aurangabad ) उभारण्यात आली. प्रकल्प उभारणीसह रहिवासी वसाहत उभारण्यासाठी सोयी सुविधा असूनही मोठ्या उद्योजकांनी मात्र या प्रकल्पाकडे पाठ फिरवली आहे. सरकारी अनास्था आणि राजकीय इच्छा शक्तीचा अभाव यामुळे जागतिक दर्जाच्या हा प्रकल्प ( Auric City Project ) ओस पडला आहे.
सर्व सोयीयुक्त प्रकल्प - शेंद्रा ,बिडकीन औद्योगिक वसाहत दिल्ली मुंबई ( Industrial Estate Delhi Mumbai ) मध्ये असलेल्या सात प्रमुख नोडल पैकी एक आहे. दहा हजार एकर वर औद्योगिक आणि रहिवासी अशी दुहेरी व्यवस्था असलेला प्रकल्प आहे. याला दुहेरी क्षमता असलेला प्रकल्प अस म्हणता येईल असे मत उद्योजक मुकुंद कुलकर्णी ( Entrepreneur Mukund Kulkarni ) यांनी व्यक्त केले. या प्रकल्पाची सकारात्मक बाजू म्हणजे धुळे महामार्ग, समृद्धी महामार्ग, रेल्वे सुविधा, विमानतळ अशा सर्व गोष्टी जवळ असणे होय. उद्योग उभारणीसाठी सर्व सोयीसुविधा असलेला हा प्रकल्प आहे. ऑरिक सिटी मुळे औद्योगिक वासाहितील महत्व प्राप्त झाले आहे असे देखील कुलकर्णी यांनी सांगितले.
राज्यांमध्ये स्पर्धा वाढली - 1980 च्या काळात वाळूज औद्योगिक वसाहत तयार झाली. त्यावेळी औद्योगिक वसाहत ( Industrial estate ) नवीन होत्या. त्यात जास्त स्पर्धा नव्हत्या. मात्र आज प्रत्येक राज्य उद्योग वाढीसाठी दारे खुली करून बसले आहेत. नवीन उद्योग येताना त्याला सोपी व्यवस्था आणि चांगली प्रणाली कुठे मिळेल याचा विचार करतो. त्यात गुजरात, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा सारखे राज्य उद्योगांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ऑरिक सिटी निर्माण झाली तरी या स्पर्धेत नवीन उद्योग आणणे म्हणजे आव्हान आहे. त्यामुळे चांगली वसाहत असली तरी अद्याप मोठे उद्योग आणणे शक्य झाले नाही. परिणामी इतकी गुंतवणूक करूनही त्याचा अद्याप म्हणावा तसा फायदा रोजगार निर्मितीसाठी झालेले नाही.
पायाभूत सुविधांचा अभाव - नवीन उद्योग येताना अनेक बाबींचा अभ्यास केला जातो. जिल्ह्यात असणारी औद्योगिक वसाहत, त्यासाठी लागणारी इमारत, उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या सुविधा, दळणवळण, ट्रान्सपोर्ट व्यवस्था आहे, का नाही याचा विचार तर केला जातोच. मात्र त्याच बरोबर शहरात असणाऱ्या पायाभूत सुविधा कशा आहेत. याचा देखील विचार केला जातो. नेमके औरंगाबाद इथेच मागे पडतो आहे. शहरात चांगले रस्ते नाहीत, पिण्यासाठी मुबलक पाणी नाही. सामाजिक आणि राजकीय स्तरावर शहरातील विविध समस्या आणि मुद्दे यामुळे येणाऱ्या अडचणी यांच्याबाबत विचार केला जातो. या सर्वांचा विचार करून काही प्रमाणात इच्छा असूनही नवीन उद्योग स्थिरावण्यास तयार नाहीत अशी खंत उद्योजकांनी व्यक्त केली.
नवीन प्रकल्पांसाठी प्रयत्न हवे - ऑरिक सिटी मध्ये नव्याने प्रकल्प आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्ह्यात पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. त्याच बरोबर शासन पातळीवर मार्केटिंग साठी आंतरराष्ट्रीय स्तरावर एजन्सी सोबत करार ( Contracts with agencies internationally ) केला पाहिजे. जेने करून जगभरात नवीन उद्योग येण्यासाठी मार्केटिंग केली जाईल. पुढील पाच वर्षांसाठी करार केल्यास याचा फायदा होईल. राजकीय नेत्यांनी शासनाकडे त्यासाठी मागणी करुन पाठपुरावा करून आग्रही राहील पाहिजे. शासन स्तरावर उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या परवानग्या आणि इतर बाबी सोप्या पद्धतीने उपलब्ध करून दिल्यास मदत होईल असं मत उद्योजक मुकुंद कुलकर्णी यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा :Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांची शिंदे सरकारमधे कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता