औरंगाबाद - मैत्रिणीच्या लग्नात ओळख झालेल्या मुंबईच्या तरुणाने औरंगाबाद येथील 26 वर्षीय डॉक्टर तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी देत, पैशांची मागणी करत गुंडांना तरुणीच्या घरी पाठवले. या प्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजहर अश्पाक शेख (रा. घाटकोपर वेस्ट, मुंबई) असे बलात्कार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तर, ओसामा खान व हमजा पठाण यांनी तरुणीच्या घरी येऊन पैसे मागितल्यामुळे त्यांचाही आरोपीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
फ्रन्टियर एअरलाईन्समध्ये चांगल्या पदावर नोकरी असल्याचे सांगितले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय पीडिता डॉक्टर आहे. तिच्या मैत्रिणीच्या लग्नात आरोपी अजहर शेख, त्याची आई सायरा शेख आदींची ओळख करून दिली होती. यावेळी पीडितेचा अजहरने मोबाइल क्रमांक घेतला होता. त्यानंतर त्याचे फोनवर संभाषण झाले. अजहरने तिला फ्रन्टियर एअरलाईन्समध्ये चांगल्या पदावर नोकरी असल्याची बतावणी केली होती. त्यानंतर त्यांच्यात व्हाट्सअॅपवर चॅटिंग वाढली. तेव्हा अजहरने पीडितेला तू मला आवडतेस, तुझ्याशी लग्न करायचे आहे, अशी मागणी घातली. तसेच, पीडितेला तूही डॉक्टर आहेस. मला सौदी एअर लाईन्समध्ये नोकरी मिळणार आहे, असे आमिष दाखविले.
एक वर्षांपासून फोटो व्हायरल करण्याची धमकी
यानंतर (४ ऑक्टोबर २०२०)रोजी अजहर हा त्याच्या नातेवाईकांकडे मोतीवालानगर येथे आला. तेथे त्याने पीडितेला भेटायला बोलावून व्हिजा काढण्यासाठी म्हणून आधार कार्ड व इतर कागदपत्र घेतले. त्यांच्यातील -बोलणे सुरूच असताना २१ नोव्हेंबर २०२० रोजी अजहर पुन्हा शहरात त्याने सेवन अॅपल हॉटेलवर जेवण करण्यासाठी म्हणून पीडितेला भेटाय बोलावले. तेथेच रूममध्ये नेऊन पीडितेवर आत्याचार केला. तेथेच त्या अश्लील फोटो व व्हिडिओ काढले. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून त्याने याने पीडितेवर बलात्कार केला असल्याची माहिती समोर आली आहे.