ETV Bharat / city

500 CR scam : मराठवाड्यात 30-30 नावाचा 500 कोटींचा घोटाळा, बिडकीन पोलिसात पहिला गुन्हा दाखल - Aurangabad latest news

औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील एका तरुणाने 2016 मध्ये दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल काॅरिडॉरसाठी (DMIC) जमिनी गेलेल्या भागात शिरकाव करून शेतकऱ्यांना गुंतवणुकीसाठी वेगवेगळी आमिषे दाखवली. आणि शेतकऱ्यांनी गुंतवणूक केल्यानंतर संतोष राठोड हा फरार झाला. या प्रकरणात तब्बल 500 कोटीपेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

500 crore scam in Marathwada named 30-30
मराठवाड्यात बिडकीनमध्ये 30-30 नावाचा 500 कोटींचा घोटाळा
author img

By

Published : Nov 17, 2021, 1:39 PM IST

Updated : Nov 17, 2021, 3:12 PM IST

औरंगाबाद - मराठवाड्यात सर्वात मोठा घोटाळा समजल्या जाणाऱ्या 'तीस-तीस' घोटाळ्यात (30-30 scam) पहिला गुन्हा औरंगाबाद ग्रामीण पोलिसात दाखल झाला आहे. बिडकीन पोलीस ठाण्यात (bidkin police station) याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर मुख्य आरोप संतोष उर्फ सुनील राठोड (sunil rathod) याच्याविरोधात सुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा घोटाळा तब्बल 500 कोटी (500 CR scam) पेक्षा अधिक मोठा असल्याचे पोलीस अधीक्षक निमित्त गोयल (Nimit Goyal, Superintendent of Police) यांनी सांगितले आहे.

पोलीस अधीक्षक निमित्त गोयल यांची प्रतिक्रिया

'तीस-तीस' घोटाळा म्हणजे काय?

औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील एका तरुणाने 2016 मध्ये दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल काॅरिडॉरसाठी (DMIC) जमिनी गेलेल्या भागात शिरकाव करून शेतकऱ्यांना गुंतवणुकीसाठी वेगवेगळी आमिषे दाखवली. विशेष म्हणजे औरंगाबादच्या बिडकीन आणि परिसरातील गावांना केंद्रबिंदू बनवले गेले. सुरुवातीला शेतकऱ्यांना महिन्याला 5 टक्क्यांनी परतावा देण्याची मार्केटिंग करणाऱ्या या तरुणाने, पुढे महिन्याला 25 टक्क्यांनी परतावा परत द्यायला सुरुवात केली. यासाठी जवळच्या नातेवाईकांना सोबत घेत 'तीस-तीस' नावाचा ग्रुप बनवला. मग अलिशान गाड्यांचा ताफा गावा-गावात फिरू लागला. लोकांना परतावा देण्यासाठी थेट गोण्यातून पैसे आणले जाऊ लागले, ज्यामुळे लोकांमध्ये आपली मार्केटींग करण्यास या तरुणाला यश आले. आणि पुढे पाहता पाहता परिसरातील अंदाजे 30 गावातील शेतकरी आपल्या जाळ्यात ओढण्याच काम या तरुणाने केले.

राठोड झाला फरार -

औरंगाबादसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना अधिकचा व्याजदर देण्याचे आमिष दाखवून संतोष राठोड याने 'तीस-तीस' योजनेत पैसे गुंतवण्यासाठी आमिष दाखवले. बँकेत मिळणाऱ्या व्याजाच्या चारपट अधिक व्याज देऊन सुरुवातीला स्व:ताची मार्केटींग केल्यानंतर राठोड गेल्या 8 महिन्यापासून फरार आहे. त्यामुळे पैसे मिळण्याची अपेक्षाभंग झाल्याने पैठण तालुक्यातील जांभळी गावातील गुंतवणूक करणाऱ्या महिलने बिडकीन पोलीस गुन्हा दाखल केला आहे.

500 कोटी पेक्षा अधिकचा घोटाळा ?

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा घोटाळा तब्बल 500 कोटी पेक्षा अधिकचा आहे. विशेष म्हणजे यात मोठ्याप्रमाणावर शेतकरी अडकले आहे. ज्या भागात सरकारी प्रकल्प राबवली जातात, त्या भागातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्यावर राठोड याने लक्ष ठेवून शेतकऱ्यांना आपल्या जाळात अडकवले. पोलीस आता राठोड याचा शोध घेत असून, तो सद्या फरार झाला असल्याचे बोलले जात आहे. काही राजकीय नेत्यांनी सुद्धा यात पैसे गुंतवणूक केल्याने शेतकऱ्यांना सुद्धा विश्वास बसला आणि उरल्या सुरल्या लोकांनी सुद्धा कोट्यावधी रुपये अधिकच्या व्याज मिळण्याच्या अपेक्षेने गुंतवले. पण आता गेली 8 महिने झाले व्याज सोडा मुद्दल सुद्धा मिळणे अवघड झाले आहे.

हेही वाचा - Aniket VishwasRao : मराठी अभिनेता अनिकेत विश्वासरावसह तिघांवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल

Last Updated : Nov 17, 2021, 3:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.