ETV Bharat / city

जायकवाडी धरणात 49 टक्के पाणीसाठा - जायकवाडी धरण

जायकवाडी धरणात 49 टक्के पाणीसाठा असून उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने जायकवाडी धरणाच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. दीड दशलक्ष घनमीटर प्रतिदिन पाण्याचे बाष्पीभवन होत असून आगामी काळात याप्रमाणेच बाष्पीभवन होत राहिल्यास एका महिन्यात दीड टीएमसी पाणी बाष्पीभवनामुळे नष्ट होईल, अशी माहिती धरण अभियंता संदीप राठोड यांनी दिली आहे.

जायकवाडी धरणात 49% टक्के
जायकवाडी धरणात 49% टक्के
author img

By

Published : May 3, 2021, 4:52 PM IST

Updated : May 3, 2021, 6:54 PM IST

पैठण - जायकवाडी धरणात 49 टक्के पाणीसाठा असून उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने जायकवाडी धरणाच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. दीड दशलक्ष घनमीटर प्रतिदिन पाण्याचे बाष्पीभवन होत असून आगामी काळात याप्रमाणेच बाष्पीभवन होत राहिल्यास एका महिन्यात दीड टीएमसी पाणी बाष्पीभवनामुळे नष्ट होईल, अशी माहिती धरण अभियंता संदीप राठोड यांनी दिली आहे.

जायकवाडी धरणात 49 टक्के पाणीसाठा

गेल्यावर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते
मागच्या वर्षी जायकवाडी धरण व धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सरासरीपेक्षा चांगला पाऊस पडल्याने, जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. धरण भरल्यानंतरही धरणात पाण्याची आवक सुरूच राहिल्यावर अनेकदा धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागला होता.

जवळपास ३५० वर्ग किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या जायकवाडी धरणाच्या पाण्यातून दररोज १.४९६ दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याची माहिती धरण अभियंता संदीप राठोड यांनी दिली आहे. तापमान वाढीमुळे जायकवाडी धरणाचे याप्रमाणे बाष्पीभवन होत राहिल्यास एका महिन्यात सरासरी दीड टीएमसी पाणी साठा हा बाष्पीभवनामुळे नष्ट होत. अशी माहितीही त्यांनी दिली.

जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 49 टक्के

सध्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 49 टक्के आहे. जायकवाडी धरणातून सिंचनासाठी डाव्या कालव्यातून २००० क्यूसेक तर उजव्या कालव्यातून ९०० क्यूसेक प्रमाणे पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती जायकवाडी धरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे..

हेही वाचा - कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेल्वेचे 11 कोच सज्ज; नागपूर महापालिकेकडे हस्तांतरण

Last Updated : May 3, 2021, 6:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.