औरंगाबाद - खेळ कोट्यातून नौकरी मिळवण्यासाठी बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे धक्कादायक प्रकार राज्यात समोर आले आहेत. औरंगाबाद विभागात 262 उमेदवारांनी खेळण्याचे प्रमाणपत्र सादर केले असून, त्यापैकी 259 प्रमाणपत्र बनावट असल्याचे तपासणी अहवालात समोर आले आहे. त्यातील 32 जणांनी या प्रमाणपत्राच्या आधारावर सरकारी नौकरी मिळवल्याचे देखील निष्पन्न झाल्याची माहिती क्रीडा उपसंचालिका उर्मिला मोराळे यांनी दिली.
हेही वाचा - शेतकरी कायद्याच्या विरोधात राज्याने काढलेल्या आदेशाची भाजपकडून होळी
विशेष म्हणजे सादर केलेले प्रमाणपत्र एकाच खेळ प्रकारातील आहे. जिम्नॅस्टिक खेळातील ट्रेम्पोलिन आणि टॅबलिंग अशा क्रीडा प्रकारातील सर्व प्रमाणपत्र आहेत. बनावट प्रमाणपत्र सादर केलेल्या 259 उमेदवारांवर लवकरच गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती उर्मिला मोराळे यांनी दिली.
खेळ कोट्यातून पाच टक्के नौकरी असते. त्या कोट्यातून नौकरी मिळावी यासाठी अनेक खेळाडू प्रयत्नशील असतात. मात्र, राज्यासाठी खेळणाऱ्या खेळाडूंचा हक्क मारून खेळाचे बनावट प्रमाणपत्र सादर करून सरकारी नौकरी मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे खेळ विभागाने केलेल्या अहवालात समोर आलं.
सन 2016 ते 2019 या काळात 262 जणांनी सरकारी नौकरी मिळण्यासाठी अर्ज केले होते. त्यामध्ये पोलीस, महसूल, परिवहन, कृषी, आरोग्य, विजवितरण, स्थानिक लेखा परीक्षण विभागात नौकरी मिळवण्यासाठी हे अर्ज करण्यात आले आहेत. संबंधित विभागामार्फत कागदपत्र पडताळणी करण्यात आली. यामध्ये खेळ खेळल्याचे सादर केलेले प्रमाणपत्र पडताळणी केले गेले. औरंगाबाद विभागा अंतर्गत येणाऱ्या पाच जिल्ह्यातील उमेदवारांचे खेळ प्रमाणपत्र तपासणी करण्यात आली. या पडताळणीत 262 पैकी 259 उमेदवारांचे खेळाचे प्रमाणपत्र बनावट असल्याचं समोर आलं. फक्त तीन उमेदवारांचे खेळ प्रमाणपत्र योग्य आहेत. या काळात 32 उमेदवारांना या बनावट प्रमानपत्रांच्या आधारावर नौकरी मिळवल्या असल्याची माहिती क्रीडा उपसंचालिका उर्मिला मोराळे यांनी दिली.
हेही वाचा - मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय, व्हायरल व्हिडिओवर सत्तारांची प्रतिक्रिया
सर्वच उमेदवारांना याबाबत पत्राद्वारे प्रमाणपत्र रद्द करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. याबाबत संबंधित विभागांनादेखील तशी माहिती कळवण्यात आली आहे. उमेदवारांनी आपल्या शालेय जीवनात खेळ खेळल्याचे हे प्रमाणपत्र सादर केले होते. सन 1997 ते 2005 या काळात खेळात सहभाग घेतला असल्याचं उमेदवारांनी सांगितलं त्यानुसार
1997 - 1
1999 18
1999 - 41
2000 - 35
2001 - 26
2002 - 32
2004 - 38
2005 - 34 उमेदवारांनी खेळ खेळला होता. मात्र, या काळात प्रमाणपत्र सादर केलेल्या ट्रेम्पोलिन आणि टॅबलिंगची कुठलीच स्पर्धा झाली नसल्याचं ऑलम्पिक विभागाकडून सांगण्यात आलं. त्यामुळे या उमेदवारांनी बनावट कागदपत्र सादर केल्याचे स्पष्ट झाल्याने या विद्यार्थ्यांनी ही प्रमाणपत्र नेमकी आणली कुठून याबाबत पडताळणी करण्याचं काम खेळ विभाग करत आहे.
लवकरच सर्व उमेदवारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती क्रीडा उपसंचालिका उर्मिला मोराळे यांनी दिली. अशाच पद्धतीने राज्यातील विविध विभागात बनावट खेळ प्रमाणपत्र सादर करून अनेकांनी सरकारी नौकरी लाटल्याची भीती व्यक्त केली जात आहे.