ETV Bharat / city

Aurangabad Accident साखरपुड्यावरून परतताना रिक्षाला बोअरवेलची धडक; एकाच कुटुंबातील दोन ठार, नऊ जखमी - औरंगाबाद करोडी फाटा अपघात न्यूज

देवगिरी हॉटेलजवळ विरुध्द दिशेने रिक्षाला भरधाव बोअरवेल वाहनाने (टीएन-३४-एए-०९०४) ओव्हरटेक करत समोरून धडक दिली. या भीषण अपघातात ( Rickshaw Borewell truck accident in Aurangabad ) रिक्षाच्या समोरील भागाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. त्यात कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला.

रिक्षाचा अपघात
रिक्षाचा अपघात
author img

By

Published : Nov 26, 2021, 3:37 PM IST

औरंगाबाद - भाच्याच्या मुलीच्या साखरपुडा आटोपून घरी परतणाऱ्या रिक्षाला बोअरवेल वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात आजीसह नातीचा मृत्यू झाला. तर नऊ जण जखमी झाले ( 2 die 9 injured in Aurangabad accident ) आहे. हा अपघात गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास करोडी फाट्यावर ( Karodi Phata accident ) घडला.

सायराबी सईद खान पठाण (३७), आयान आरिफ मलक (१०, दोघेही रा. सावतानगर, रांजणगाव शेणपुंजी) अशी मृतांची नावे आहेत. लासूर स्टेशन येथे भाच्याच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी ( Accident while returning from engagement program ) पठाण व मलक कुटुंबिय स्वत:च्या रिक्षाने ( एमएच-२०-ईएफ-१३७० ) गेले होते. हे कुटुंब सायंकाळी कार्यक्रम आटोपून करोडी फाटामार्गे रांजणगाव शेणपुंजीकडे जात होते. देवगिरी हॉटेलजवळ विरुध्द दिशेने रिक्षाला भरधाव बोअरवेल वाहनाने (टीएन-३४-एए-०९०४) ओव्हरटेक करत समोरून धडक दिली. या भीषण अपघातात ( Rickshaw Borewell truck accident in Aurangabad ) रिक्षाच्या समोरील भागाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. त्यात सायराबी यांचा जागीच मृत्यू झाला. तर नातू आयान हा गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान आयानचा घाटीत मृत्यू झाला.

हेही वाचा-पानटपरीवर पान खाणे बेतले जीवावर; विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

अपघातात मुस्कान मलक, सबिना मलक, हिना मलक, खालेदा मलक, नजमा मलक, मुस्कान मलक, आफ्रिन मलक, अनिसाबी पठाण व कामिल पठाण हे गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच दौलताबाद पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ जखमींना घाटीत हलवले. मात्र, या अपघाताची नोंद दौलताबाद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

हेही वाचा-रेल्वे अपघातात पाय गमावणाऱ्या रुपाली मोरेला ठाणे महानगरपालिकेने दिले हक्काच घर

9 नोव्हेंबरलाही अपघात

दूध घेऊन जाणाऱ्या पिकअपच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना 9 नोव्हेंबरला औरंगाबादमध्ये घडली होती. राजेंद्र शंकर भादवे असे मृत तरुणाचे नाव होते. बीड बायपास रोडवरील आडगाव पुलाजवळ हा अपघात घडला होता. नवीन बीड बायपासवर दोन्ही बाजूंच्या वाहतुकीसाठी रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकण्यात आले आहेत. मात्र हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. तरीही वन वे रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहनांची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे अपघात घडल्याचे बोलले जात होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.