औरंगाबाद - अनेकवेळा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करणाऱ्या घाटी रुग्णालयात ( Ghati Hospital Delivery ) पुन्हा एकदा ऐतिहासिक शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. 155 किलो वजनाच्या ( 155 Kg Delivery ) महिलेची प्रसूती शस्त्रक्रिया असून जगातील ही 7वी घटना मानली जात आहे.
महिलेला होत्या व्याधी -
घाटी रुग्णालयात एक गर्भवती महिला काही दिवसांपूर्वी उपचारासाठी आली. महिला पथक प्रमुख डॉ. विजय कल्याणकर पथकाकडे उपचारबाबत जबाबदारी देण्यात आली. महिलेचे वजन वजन 155 किलो होते, तर तिला उच्च रक्तदाब, मधुमेह आणि पोटाचा विकार होता. यासोबतच पहिली प्रसूती सिझेरियन शस्त्रक्रियेने झाली होती. शिवाय जगात आजवर 66 बीएमआय असलेल्या अवघ्या 6 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. यामुळे ही प्रसूती घाटी रुग्णालयातील डॉक्टरांना हे एक आव्हान होते.
शस्त्रक्रियेची विशेष तयारी -
अतिशय अवघड असणारी शस्त्रक्रिया करण्यासाठी घाटी रुग्णालयाने एका महिन्यापूर्वी शस्त्रक्रियेची विशेष तयारी करण्यात आली. अद्यावत विशेष उपकरणे, दोन ट्रॉलीज, दोन ऑपरेशन टेबल आदींची उपलब्धता करण्यात आली. स्त्री व प्रसूतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली 24 जानेवारीस गर्भवती महिलेवरील अत्यंत गुंतागुंतीची सिझेरियन शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडली. माता आणि बाळ सुखरूप आहेत. विशेष म्हणजे अशा प्रकारची जगातील 7वी शस्त्रक्रिया घाटी रुग्णालयात पार पडल्याने या यशाबद्दल संपूर्ण वैद्यकीय टीमचे कौतुक होत आहे. डॉ. श्रीनिवास एन. गडप्पा यांनी ही शस्त्रक्रिया केली, त्यांना डॉ. विजय वाय. कल्याचकर, डॉ. सोनाली एस. देशपांडे, डॉ. प्रशांत भिंगारे, डॉ. अनुराग सोनवणे, डॉ. रुपाली गायकवाड यांनी मदत केली. तसेच डॉ. गायत्री तडवळकर, डॉ. सुचिता जोशी, डॉ. प्रशांत पाचोरे व डॉ. सय्यद अनिसा या भूलतज्ज्ञांनी मदत केली.
हेही वाचा - Sairat Incidence in Miraj : मिरजेत सैराटचा थरार; प्रेमविवाह केलेल्या तरुणावर हल्ला