ETV Bharat / city

Aurangabad Omicron : उपचार घेऊन घरी परतलेल्या 14 जणांचा ओमायक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह - ओमायक्रॉन लागण औरंगाबाद

एकाच वेळी 14 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 19 वर गेली आहे. त्या सर्व रुग्णांबाबत माहिती घेतली असता ते सर्व निगेटिव्ह असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.

जिल्हा रुग्णालय औरंगाबाद
जिल्हा रुग्णालय औरंगाबाद
author img

By

Published : Jan 18, 2022, 5:05 PM IST

औरंगाबाद - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची भर पडत असताना ओमायक्रॉन रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. एकाच दिवशी 14 जणांचा ओमायक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र तोपर्यंत सर्व रुग्ण उपचार घेऊन घरी देखील गेले. त्यामुळे या रुग्णांवर लक्ष ठेवण्याची वेळ आली आहे.

आधी आढळले होते 5 रुग्ण

मागील महिना भरात याआधी ओमायक्रॉनचे 5 रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर एकाच वेळी 14 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 19 वर गेली आहे. त्या सर्व रुग्णांबाबत माहिती घेतली असता ते सर्व निगेटिव्ह असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.

अहवाल येण्यासाठी होतोय उशीर

ओमायक्रॉन रुग्णांचा अहवाल देणारी जिनोम सिक्वेन्सिंग लॅब सद्यातरी फक्त मुंबई-पुण्यात उपलब्ध असल्याने अहवाल येण्यासाठी बराच वेळ लागत आहे. या रुग्णांचे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात स्वॅब चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. तर अहवाल येईपर्यंत रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह येत असून, ते ठणठणीत होत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात असलेल्या लॅबमध्ये अत्याधुनिक यंत्रणा सज्ज असल्याने जिनोम सिक्वेन्सिंग तपासणी करणे शक्य आहे. मात्र प्रशासकीय पातळीवर वेळेत निदान होऊन त्या अनुषंगाने उपचार करणे शक्य होणार आहे. मात्र तसे होत नसल्याने अहवाल येण्यास 10 ते 15 दिवसांचा कालावधी जात आहे.

हेही वाचा - Naming Ceremony At Rani Bagh : राणीबागेत पेंग्विन, वाघाच्या पिल्लांचे बारसे, 'ऑस्कर' आणि विरा' असे नामकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.