ETV Bharat / city

सराईत गुन्हेगाराकडून १२ दुचाकी जप्त, सिटी चौक पोलिसांची कारवाई - city chowk police

शहरासह सिंदखेड राजा, औंढा नागनाथ, जालना येथील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन दुचाकी चोरी करणाऱ्या सराई गुन्हेगाराला साथीदारासह सिटी चौक पोलिसांनी अटक केली.

two wheelers seized
गुन्हेगाराकडून १२ दुचाकी जप्त
author img

By

Published : Mar 23, 2021, 3:03 PM IST

Updated : Mar 23, 2021, 3:23 PM IST

औरंगाबाद - शहरासह सिंदखेड राजा, औंढा नागनाथ, जालना येथील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन दुचाकी चोरी करणाऱ्या सराई गुन्हेगाराला साथीदारासह सिटी चौक पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून 8 लाख 50 हजार रुपये किमतीच्या १२ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

औरंगाबादेत गुन्हेगाराकडून १२ दुचाकी जप्त

हेही वाचा - राष्ट्रीय कब्बडी स्पर्धेवेळी प्रेक्षक गॅलरी कोसळून 150 पेक्षा अधिक जण जखमी

सैय्यद हारुण सैय्यद नसिब अली (वय 30 वर्ष रा. लोणार जुना पोष्ट ऑफिस समोर काटेनगर ता. लोणार जि. बुलढाणा) असे आरोपीचे नाव आहे. हारूण हा विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरी करून विक्री करायचा. त्याने औरंगाबाद शहरासह सिंदखेड राजा, औंढा नागनाथ, जालना येथील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतुन १२ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेल्या सहा दुचाकी शेख वसिम शेख अस्लम रा. लोणार झोपडपट्टी लोणार याला विकायचे सांगितले.

यावेळी पोलिसांच्या विशेष पथकाने वसीम याला ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून ६ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अशा दोन्ही आरोपींकडून 8 लाख 50 हजार रुपये किमतीच्या १२ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - अनिल देशमुखांविरोधात परमबीर सिंग सर्वोच्च न्यायालयात, याचिकेतून भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी

Last Updated : Mar 23, 2021, 3:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.