ETV Bharat / city

यशोमती ठाकूर या जिल्ह्यातील दंगलींच्या मास्टर माईंड, भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांचा आरोप - अमरावती दंगली अनिल बोंडे प्रतिक्रिया

गत काही दिवसांपासून अमरावती शहर आणि जिल्ह्यात दंगली होत आहेत, तर अनेक भागांत दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. या अशा परिस्थितीच्या मास्टर माईंड जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर याच आहेत, असा आरोप ( Amravati riots Anil Bonde allegations ) भाजप नेते आणि माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे ( Amravati riots Anil Bonde reaction ) यांनी केला.

amravati riots Anil Bonde allegations
अमरावती दंगली अनिल बोंडे प्रतिक्रिया
author img

By

Published : Apr 19, 2022, 2:13 PM IST

अमरावती - गत काही दिवसांपासून अमरावती शहर आणि जिल्ह्यात दंगली होत आहेत, तर अनेक भागांत दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. या अशा परिस्थितीच्या मास्टर माईंड जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर याच आहेत, असा आरोप ( Amravati riots Anil Bonde allegations ) भाजप नेते आणि माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे ( Amravati riots Anil Bonde reaction ) यांनी केला.

माहिती देताना भाजप नेते अनिल बोंडे

हेही वाचा - Angarki chaturthi 2022 : अंगारकी चतुर्थी निमित्त 'दगडूशेठ' गणपतीला स्वराभिषेक, मंदिराला सुंदर फुलांची आरास

डॉ. अनिल बोंडे यांचा आरोप - अमरावती शहरात 12 नोव्हेंबरला जी दंगल उसळली होती त्या दंगलीतील आरोपींना वाचविण्याचे काम जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले. वलगाव येथे तीन ते चार मुस्लीम युवकांनी एका हिंदू तरुणाला मारहाण केली. या प्रकरणातही हिंदू युवकाला मारहाण करणार्‍यांना वाचविण्यासाठी यशोमती ठाकूर समोर आल्या. जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांना यशोमती ठाकूर यांचा पाठिंबा असल्यामुळेच या धंद्यात असणाऱ्या विशिष्ट समुदायाला बळ देण्याचे काम यशोमती ठाकूर करीत असल्याचा आरोप डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे.

अचलपूरच्या घटनेचा भाजपकडून निषेध - रविवारी रात्री अचलपूर येथील दुल्हा गेटवर भाजपचे अचलपूर शहराध्यक्ष अभय महात्मे यांनी भगवा झेंडा फडकवल्यानंतर दोन गटात तणाव निर्माण झाला होता. या प्रकारानंतर दोन्ही बाजूने प्रचंड दगडफेक करण्यात आली होती. या दगडफेकीत पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य पाहता अचलपूर आणि परतवाडा येथे संचारबंदी घोषित करण्यात आली.

सध्या अचलपूर आणि परतवाडा मध्ये स्मशानशांतता पसरली असतानाच अचलपूर येथील परिस्थितीसाठी दोषी असणाऱ्या भाजपचे अचलपूर शहर अध्यक्ष अभय महात्मे यांना पुणे येथे आज अटक करण्यात आली. अभय महात्मे यांना अटक केल्यामुळे अमरावती शहर भाजपसह जिल्हा भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध आंदोलन छेडण्यात आले आहे.

माजी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांच्यासह भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, महापौर चेतन गावंडे भाजपचे शहराध्यक्ष किरण पातुरकर, माजी शहर अध्यक्ष तुषार भारतीय, भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, प्रा. रवींद्र जयंत डेहनकर आदी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. या आंदोलनादरम्यान जय श्रीराम चे नारे देण्यात येत आहेत. आंदोलनस्थळी हनुमान चालीसा पठण नाही करण्यात आले.

हेही वाचा - सियाचीनमध्ये भारतीय सैनिकांच्या सर्वधर्म स्थळांमध्ये दगडूशेठ गणपती बाप्पा होणार विराजमान

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.