अमरावती- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटूंबाचे हाल होऊ नये म्हणून त्यांच्या उदरनिर्वाहासाठी केंद्र सरकारकडून देशभरातील लाखो महिलांच्या जनधन खात्यात प्रत्येकी पाचशे रुपयांची रक्कम टाकण्यात आली आहे. दरम्यान, ती रक्कम काढण्यासाठी अमरावती शहरातील रुख्मिनीनगर येथील भारतीय स्टेट बँकेसमोर शेकडो महिलांनी तुफान गर्दी केली. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला आहे.
लॉकडाऊन असल्याने महिलांना काम मिळत नाही म्हणून जनधन खात्यात आलेली रक्कम काढण्यासाठी महिलांनी गर्दी बँकेसमोर गर्दी केली. उन्हाचा पारा वाढला असूनही महिला 500 रुपयांसाठी जीवाची पर्वा नकरता रांगेत उभ्या राहिल्याचे चित्र आहे.
उन्हापासून बचाव करण्यासाठी बँकेने कोणतीच उपायृयोजना केली नसल्याचे समोर आले आहे.