अमरावती - मध्यप्रदेशात सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप नेहमीच पैसा आणि सत्तेचा गैरवापर करत आला आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रानंतर आता मध्यप्रदेशात देखील भाजप तेच करत आहे, अशा भाषेत यशोमती ठाकूर यांनी भाजपवर टीका केली.
हेही वाचा... मध्यप्रदेशमधील काँग्रेस सरकार कोसळलं, कमलनाथ यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
भाजपवर सडकून टीका करत असताना ठाकूर यांनी, कमलनाथ यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. 'कलमनाथ यांच्यावर आपल्याला विश्वास आहे. ते लवकरच यातून बाहेर पडतील. भाजपने या अगोदर कर्नाटक व महाराष्ट्र राज्यात हेच केले. पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर हेच भाजपचे मूळ आहे. हे आता पुन्हा स्पष्ट झाले आहे' अशी टीका यशोमती ठाकूर यांनी भाजपवर केली.