अमरावती - तिवसा तालुक्यातील तारखेड गावात एका महिलेचा बाथरूममधील टाकीत पडल्यानंतर बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अर्चना संजय मेश्राम असे या 28 वर्षीय महिलेचे नाव असून, तिच्या मृत्यूमुळे कुटूंबावर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा... गायिका गीता माळी यांचे अपघातात निधन
महिलेच्या मृत्यूनंतर तिवसा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, महिलेचा आंघोळी दरम्यान बाथरूममधील टाकीत पडून मृत्यू झाला आहे. ही महिला काही दिवसांपूर्वी तिवसा तालुक्यातील तारखेड येथे दिवाळी सणा निमित्त माहेरी आली होती. गुरूवारी ती आंघोळीला गेली असता अचानक टाकीत पडली. यानंतर आंघोळीला जाऊन बराच झाल्यानंतरही ती बाहेर न आल्याने, कुटूंबीयांनी पाहिले असता अर्चना टाकीत पडल्याचे दिसून आले. परंतु ती टाकीत कशी पडली, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास पोलीस करत आहे.
हेही वाचा... आरएफएल प्रकरण : आर्थिक घोटाळ्याप्रकरणी मालविंदर सिंगला ईडीने केली अटक