ETV Bharat / city

Amravati : राणा आणि राऊतांच्या लद्दाखमधील 'त्या' भेटीवर काय म्हणतात शिवसैनिक आणि युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते, वाचा... - राणा राऊत मिटींग शिवसैनिक प्रतिक्रिया

राणा समर्थक ( Ravi Rana ) आणि शिवसैनिकांनीमधला राडा ( Rana Vs Shivsena ) अमरावतीकर सतत पाहत असताना काही दिवसांपूर्वी लद्दाखमध्ये राणा दाम्पत्य आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या ( Sanjay Raut And Navneet Rana Meeting In Ladakh ) भेटीचे फोटो व्हायरल झालेत आणि नेत्यांमधील हा वाद संपुष्टात आला, असा संदेश पसरविण्यात आला. याबाबत 'ईटीव्ही भारत' ने राणा समर्थक आणि शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता दोन्ही बाजूंनी दोन टोकांच्या भूमिका समोर आल्या.

Amravati Shivsena News
Amravati Shivsena News
author img

By

Published : May 23, 2022, 4:08 PM IST

Updated : May 23, 2022, 4:49 PM IST

अमरावती - हनुमान चालीसा पठण आवरुन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी 15 एप्रिल पासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत टीकेची झोड उठवली आणि हा विषय थेट राणा दांपत्याला बारा दिवसाच्या कारावासात घेऊन गेला. 5 मेपर्यंत राणा समर्थक ( Ravi Rana ) आणि शिवसैनिकांनीमधला राडा ( Rana Vs Shivsena ) अमरावतीकर सतत पाहत असताना काही दिवसांपूर्वी लद्दाखमध्ये राणा दाम्पत्य आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या ( Sanjay Raut And Navneet Rana Meeting In Ladakh ) भेटीचे फोटो व्हायरल झालेत आणि नेत्यांमधील हा वाद संपुष्टात आला, असा संदेश पसरविण्यात आला. . नेत्यांची हसत-खेळत भेट झाली असली तरी वास्तवात मात्र अमरावतीत राणा समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये काही सेट नसल्याचेच वास्तव आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत' ने राणा समर्थक आणि शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता दोन्ही बाजूंनी दोन टोकांच्या भूमिका समोर आल्या.

प्रतिक्रिया

राणा समर्थक म्हणतात आमचे मतभेद, मनभेद नाही - लद्दाख येथील परिस्थिती चा दौरा करण्यासाठी केंद्रीय समिती मध्ये खासदार नवनीत राणा आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सोबत होते. या दौर्‍यात आमदार रवी राणा हे सुद्धा सहभागी झाले होते. लडाखमध्ये महाराष्ट्राचा विषय भेटणे हे योग्य नाही आणि महाराष्ट्राची अशी संस्कृतीही नाही. यामुळेच हनुमान चालीसावरून महाराष्ट्रात जो काही गोंधळ उडाला, तो विषय लद्दाखमध्ये काढणे महाराष्ट्रासाठी शोभणारे नव्हते. यामुळेच खासदार नवनीत राणा आणि खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राची परंपरा जोपासत लद्दाखमध्ये लद्दाखात यांच्याच प्रश्‍नांकडे लक्ष दिले. बाकी महाराष्ट्रात शिवसेनेच्या चुकीच्या भूमिकेचा आम्ही ठामपणे विरोध करत राहू. महाविकास आघाडी सरकारमधल्या ज्या काही चांगल्या गोष्टी असतील, त्याचे स्वागतही करू, अशी प्रतिक्रिया आमदार रवि राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष जितू दुधाने आणि युवा स्वाभिमान पार्टी कोर कमिटी सदस्य बाळासाहेब इंगोले यांनी 'ईटीवी भारत'शी बोलताना दिली.

शिवसैनिक म्हणतात राणांची लद्दाखमध्येही नौटंकी - खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे किती नौटंकीबाज आहेत, हे नव्याने सांगायची गरज नाही. खासदार संजय राऊत यांनी राणा दांपत्याची कुठल्याही प्रकारची सलगी केलेली नाही. लद्दाखमध्ये केंद्रीय समितीच्या दौर्‍यात असताना ज्या ठिकाणी खासदार संजय राऊत आहेत, तेथेच उभे राहून राणा दाम्पत्याने फोटोसेशन करून घेतले. आणि हे फोटो मुद्दाम माध्यमांच्याद्वारे पसरविले. गेल्या महिनाभरात राणा दाम्पत्याने जो काही गोंधळ घातला. तो शिवसैनिक कधीही विसरू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा टेंभरे आणि शिवसैनिक संजय गव्हाळे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.

शिवसैनिक आणि राणा समर्थकांमध्ये झाला होता राडा - अमरावतीत शिवसैनिक आणि राणा समर्थकांतमध्ये 2014च्या लोकसभा निवडणुकीपासून कट्टर वैरत्व आहे. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा या शिवसेनेचे खासदार आनंद अडसूळ यांचा पराभव करू शकले नाही. मात्र, तेव्हापासून राणा समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये नेहमीच वाद झालेत. आता 2019 च्या निवडणुकीत नवनीत राणा यांनी आनंद अडसूळ यांचा जबर पराभव केल्यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये राणा यांच्या विरोधात तीव्र नाराजी पसरली असून राणा समर्थकांनी शिवसैनिकांमध्ये नेहमीच वाद होत राहतात. आता हनुमान चालीसा पठण आवरुन राणा दाम्पत्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिल्यावर शिवसैनिक आणि राणा समर्थकांमध्ये वाद उफाळून आला. राणा दाम्पत्य मुंबईत असताना शिवसैनिकांचा मोर्चा राणा यांच्या शंकर नगर स्थित निवास्थानी धडकला होता. यानंतर राणा समर्थकांनी शिवसेनेचे राजापेठ येथील कार्यालय फोडले होते.

राणा समर्थकांनी संजय राऊतांसाठी खोदला होता खड्डा - नागपूर दौऱ्यावर असताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राणा दाम्पत्याला 2O फूट खड्ड्यात काढून टाकावे, अशा स्वरुपाचे वक्तव्य केले होते. खासदार राऊत यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राणा समर्थकांनी अमरावतीत शंकर नगर परिसरातील एका मैदानात 2O फूट खड्डा खोदून संजय राऊत यांचा निषेध नोंदविला होता. एकूणच राणा समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये अमरावतीत टोकाचे वाद आहेत.

28 ला राणा दाम्पत्य येणार अमरावतीत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी 23 एप्रिलला हनुमान चालीसा पठण करण्याच्या उद्देशाने खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे 21 एप्रिलच्या रात्रीचा अमरावतीतून रवाना झाले होते. या नंतर मुंबईत झालेला गोंधळ आणि त्यानंतर राणा दाम्पत्याला झालेला कारावास. कारावासातून निघाल्यावर त्यांची दिल्लीवारी आणि तेथून केंद्रीय समितीच्या माध्यमातून लद्दाख दौरा आटपून आता राणा दाम्पत्य 28 एप्रिलला अमरावतीला येणार आहे. नागपूर येथून सुमारे शंभर गाड्यांच्या ताफ्यासह राणा दाम्पत्य अमरावतीला पोहोचणार आहे. राणा दांम्पत्य अमरावतीत आल्यावर राणा समर्थक आणि शिवसैनिकांमधला वाद शांत होणार की आणखी विकोपाला जाणार, याची उत्सुकता अमरावतीकरांना आहे.

हेही वाचा - Rajesh Tope On Corona Fourth Wave : आरोग्यमंत्र्यांचे कोरोनाच्या चौथ्या लाटेबद्दल मोठे वक्तव्य, म्हणाले...

Last Updated : May 23, 2022, 4:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.