अमरावती - काही विशिष्ट राजकीय लोकांना महापालिका निवडणूक जिंकण्याचा लाभ मिळावा, या हेतूने अमरावती शहरातील प्रभाग (Amravati City Ward formation) रचना करण्यात आली असल्याचा आरोप आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी केला आहे. यासंदर्भात आमदार राणा यांनी मुंबई राज्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान (UPS Madan) यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तक्रार दिली आहे.
'नागरिकांना सुविधांपासून वंचित ठेवण्याचा डाव' -
ज्या काही विशिष्ट राजकीय व्यक्तींच्या हितासाठी महापालिका प्रशासनाने (Muncipal Corporation Election) येणाऱ्या निवडणुकीसाठी प्रभागाची रचना केली आहे. ही अशी रचना म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना महत्त्वाच्या सुविधांपासून वंचित ठेवण्याचा डाव असल्याचे निदर्शनास येत आहे, असे आमदार रवी राणा यांनी राज्य निवडणूक आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्याबाबतही आमदार रवी राणा यांनी निवडणूक आयुक्तांकडे रोष व्यक्त केला आहे.
'कारवाई करण्याची केली मागणी' -
विशिष्ट व्यक्तींचे हित डोळ्यासमोर ठेवून अमरावती शहराची प्रभाग रचना करणाऱ्या महापालिकेतील अधिकार्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार रवी राणा यांनी राज्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान यांच्याकडे केली आहे.
'नव्याने होणार प्रभागाची रचना' -
अमरावती महापालिका निवडणुकीसाठी जी काही प्रभाग रचना झाली आहे, त्याबाबत विविध राजकीय पक्षांच्यावतीने रोष व्यक्त केला जात असताना माझ्या तक्रारी नुसार आता या आराखड्याला संधी दिली जाणार असून विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली नव्याने प्रभागाची रचना केली जाणार असल्याचे निवडणूक आयुक्तांनी मला सांगितले असल्याचे आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - Devendra Fadnavis : राज्यात दारुवरचे कर कमी होतात, पण पेट्रोल-डिझेलवरचे होत नाही - देवेंद्र फडणवीस