अमरावती - मानसिक व आर्थिक पिळवणूक थांबेपर्यंत दहावी व बारावीच्या मुल्यांकनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय व्यवसाय शिक्षकांनी घेतला आहे. यासंदर्भाचे पत्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अमरावती विभागाच्या सचिवांना देण्यात आले.
हेही वाचा - हुतात्मा सीआरपीएफ जवान मुकुंद ठाकरे यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन
कौशल्याभिमुख शिक्षण योजनेची गुणवत्ता ढासळली
व्यवसाय शिक्षण योजनेची अंमलबजावणी व सनियंत्रणाची जबाबदारी असलेल्या समग्र कार्यालयामार्फत या योजनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे समाजातील अतिदुर्गम व वंचित आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या कौशल्याभिमुख शिक्षण योजनेची गुणवत्ता ढासळत असल्याचा आरोप व्यवसाय शिक्षकांनी केला.
खसगी कंपन्यांनी केले वाटोळे
अतिशय महत्वाच्या आणाऱ्या व्यवसाय शिक्षणाचे खसगी कंपन्यांनी वाटोळे केले आहे. शासनाच्या या योजनेची अमलबजावणी करण्यासाठी राज्याबाहेरील विविध कंपन्यांना कंत्राट देऊन नफा कामविण्याच्या धोरणामुळे शिक्षण क्षेत्राला बट्टा लागला आहे. समग्र कार्यालय व योजनेचे मुल्यांकन करणारी त्रयस्थ संस्था मिळून पायाभूत सुविधा पुरविण्याच्या नावाखाली अपहार करीत आल्याचा आरोपही शिक्षण मंडळाला दिलेल्या पत्रात करण्यात आला आहे.
..अशा आहेत मागण्या
इतर राज्यांप्रमाणे अनुभवी आणि सेवांतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांची नियुक्ती कायम ठेवावी. पूर्वीप्रमाणे 12 महिन्याचे वेतन नियमित देण्यात यावे. कंपनीद्वारे शिक्षकांची आर्थिक व मानसिक पिळवणूक थांबविण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती थेट समग्र कार्यालय मुंबई मार्फत करण्यात यावी. पाच वर्षांपासून थकलेली वेतनवाढ देण्यात यावी. क्रीडा आणि मीडिया हा विषय सुरू करून विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे, मे 2020 मध्ये कर्तव्यावर असणाऱ्या शिक्षकांना मे महिन्याचे वेतन मिळावे. कोविड काळात ऑनलाइन वर्ग घेणाऱ्या शिक्षकांना वेतन मिळावे, अशा विविध मागण्या व्यवसाय शिक्षकांनी केल्या.
..यांनी दिले निवेदन
व्यवसाय शिक्षक महासंघाच्यावतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांना निवेदन सादर करताना निलेश गवई, आकाश सायरे, अमित अस्वार, रोहिणी उमक, मुद्सिर खान, सुबोध उले, रिंकू राठोड, ज्ञानेश्वर जोगदांडे, खुशाल पाचपोर, आकंशा उमक आदी व्यवसाय शिक्षक उपस्थित होते.
हेही वाचा - चांदूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; दोन गावात चोरी