अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने ( Sant Gadge Baba Amravati University ) परीक्षा ऑफलाइन घ्यावी की ऑनलाईन घ्यावी, यासंदर्भात विद्यार्थ्यांचे अनेक आंदोलन झाले. आता परीक्षा ही बहुपर्यायी पद्धतीने घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली असतानाच राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ( Amravati University Exam ) या कुठल्या पद्धतीने होतील. याबाबतचा निर्णय कोर्टाच्या निकालावर अवलंबून आहे.
आमदार राणा यांनी घेतली कुलगुरूंची भेट - जळगाव, नागपूर आणि गोंडवाना विद्यापीठ याप्रमाणे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने बहुपर्यायी पद्धतीने परिक्षा घ्यावी. या मागणीसाठी काँग्रेस भाजप युवा स्वाभिमान विद्यार्थी संघटनेच्यावतीने विद्यापीठावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार रवी राणा यांनी विद्यार्थ्यांची बाजू कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्यासमोर मांडली. कुलगुरूंनी यावेळी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, अशी विद्यापीठाची भूमिका असून शासनाच्या निर्णयाप्रमाणे आणि परीक्षा संदर्भात निर्णय घेऊ अशी भूमिका मांडली.
आज येणार कोर्टाचा निर्णय - राज्यातील सर्वच विद्यापीठांत बहुपर्यायी पद्धतीने परीक्षा घेण्यासंदर्भात आज सायंकाळपर्यंत निर्णय येण्याची शक्यता आहे. परीक्षेसंदर्भात न्यायालयाचा जो काही निर्णय येईल, त्यानुसारच आम्ही परीक्षा घेऊ. कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही अशीच आमची भूमिका असल्याचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडा यावेळी म्हणाले. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त विद्यापीठावर विद्यार्थ्यांचा मोर्चा धडकला असताना विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. जोरदार घोषणा दिल्या आहेत.
हेही वाचा - राणा दाम्पत्य राहत असलेल्या इमारतीची पालिकेकडून तपासणी सुरू