ETV Bharat / city

Umesh kolhe Murder Case : नवनीत राणांचा पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप; आरती सिंह म्हणाल्या, 'माझ्यासह अमरावती...'

नवनीत राणांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्तांनी उमेश कोल्हे हत्या प्रकरण ( Umesh kolhe Murder Case ) दडपण्याचा प्रकार केल्याचा आरोप केला ( Navneet Rana Allegation Aarti Singh ) होता. त्यावर माझ्यासह संपूर्ण अमरावती पोलिसांवर आरोप करत आहेत. ते आरोप बिनबुडाचे आहेत, अशी प्रतिक्रिया आरती सिंह यांनी दिली ( Aarti Singh Hits Back Navneet Rana Over Allegation ) आहे.

navneet rana arti singh
navneet rana arti singh
author img

By

Published : Jul 4, 2022, 4:57 PM IST

Updated : Jul 4, 2022, 7:27 PM IST

अमरावती - उमेश कोल्हे हत्या प्रकरणात सातही आरोपींना अटक करण्यात ( Umesh kolhe Murder Case ) आली आहे. त्यात आता खासदार नवनीत राणांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रकार केल्याचा आरोप ( Navneet Rana Allegation Aarti Singh ) केला होता. त्यावर आता आरती सिंह यांनी खासदार राणांना प्रत्युत्तर दिलं आहे. खासदार राणा या माझ्यासह संपूर्ण अमरावती पोलिसांवर आरोप करत आहेत. ते आरोप बिनबुडाचे आहेत, असे प्रतिक्रिया आरती सिंह यांनी दिली ( Aarti Singh Hits Back Navneet Rana Over Allegation ) आहे.

  • Allegations coming from just one source. BJP's RS MP from Amravati met me.I told him everything.He didn't level allegations. In contrast,one who levelled allegations didn't collect any info from us: Amravati Police Commissioner on allegations in connection with Umesh Kolhe murder pic.twitter.com/8WLH9zkb41

    — ANI (@ANI) July 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

उमेश कोल्हे हत्या प्रकरण दाबण्यासाठी अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी पोलीस अधिकारी आणि पत्रकारांवर दबाव आणल्याचा धक्कादायक आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. या प्रकरणी आम्ही गृहमंत्रालयाकडे याची तक्रार केल्यानंतर अमरावती पोलिसांनी कारवाई सुरू केल्याचेही राणा यांनी म्हटले आहे. तसेच त्यांची आरती सिंग यांचीही चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणीही नवनीत राणा यांनी केली होती. त्यावर आता आरती सिंह यांनी उत्तर दिलं आहे.

पोलीस आयुक्त आरती सिंह एएनआयशी संवाद साधताना

आरती सिंह म्हणाल्या की, अमरावती पोलिसांनी उमेश कोल्हे हत्या प्रकरणात योग्य कारवाई केली. हे प्रकरण दडपण्याचा कुठलाही विषय नव्हता. आम्ही सर्व बाजूंचा विचार करूनच तपास करीत होतो. तरी देखील अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या माझ्यासह संपूर्ण अमरावती पोलिसांवर जो काही आरोप करीत आहेत. ते आरोप बिन बुडाचे आहेत.

"तपास एनआयकडे" - 21 जूनच्या रात्री औषधी व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मा संदर्भातील पोस्ट शेअर केल्यामुळेच झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सातही आरोपींना एनआयएकडे सोपविले जाणार आहे, असे आरती सिंह यांनी स्पष्ट केले.

"अतिशय संवेदनशील प्रकरणाचा छडा लावण्यात यश" - उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी योग्य चौकशी केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. उमेश कोल्हे यांची हत्या करतात मी स्वतः पथकाचा घटनास्थळी पोहोचली. त्यावेळी हे संपूर्ण प्रकरण अतिशय गुंतागुंतीचे होते. मात्र, पोलिसांनी या अतिशय संवेदनशील प्रकरणाचा छडा लावण्यात यश मिळवले. या प्रकरणात युसुफ खान हात मुख्य आरोपी असल्याचे देखील पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी सांगितलं आहे.

काय आहे प्रकरण? - शहरातील उमेश कोल्हे ( रा. घनश्यामनगर ) या मेडिकल व्यावसायिकाची चाकून गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. 21 जून रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. कोल्हे यांचे तहसील कार्यालय परिसरात मेडिकल स्टोअर्स आहे. मंगळवारी रात्री त्यांनी मेडिकल स्टोअर्स बंद केले. त्यानंतर ते मुलगा संकेत (२७) व सून वैष्णवी यांच्यासोबत घरी जायला निघाले. समोर एका दुचाकीवर उमेश तर मागे दुसऱ्या दुचाकीवर मुलगा संकेत व त्यांची पत्नी वैष्णवी जात होते. न्यू हायस्कूल मेन समोरील गल्लीतून जात असताना एका दुचाकीजवळ तीन जण उभे होते. त्यातील एकाच्या हातात चाकू होता. ते तिघेही अचानक उमेश यांच्या दुचाकीच्या आडवे झाले.

तिघांपैकी एकाने केला गळ्यावर वार - त्यामुळे उमेश यांनी दुचाकी थांबविली. यावेळी काही कळण्याआधीच तिघांपैकी एकाने चाकूने उमेश यांच्या गळ्यावर वार केला तर ईतरांनीही मारहान करण्यास मदत केली. त्यामुळे उमेश हे दुचाकीसह खाली कोसळले. हा प्रकार त्यांच्या मागे येत असलेल्या मुलगा संकेत व सून वैष्णवी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दुचाकी थांबवून आरडाओरड केली. त्यामुळे तिनही मारेकरी दुचाकीने तेथून पळून गेले. त्यानंतर संकेत व वैष्णवी यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने उमेश यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान काही वेळातच उमेश यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर घटनेची माहिती कोतवाली पोलिसांना देण्यात आली.

'या' आरोपींना अटक - या प्रकरणी पोलिसांनी अतिफ राशीद आदिल रशीद ( वय, २४ रा. मौलाना आझाद कॉलनी), मुदस्सीर अहेमद शेख इब्राहिम ( वय २२, रा. बिसमिल्लानगर ), शाहरूख पठाण हिदायत खान ( वय२४, रा. सुफियाननगर), अब्दुल तौफिक उर्फ नानू शेख तसलिम ( वय, २४ रा. बिसमिल्लानगर ) आणि शोएब खान उर्फ भुऱ्या वल्द साबीर खान (वय २२, रा. यास्मीननगर ), युसूफ खान बहादूर खान (44) आणि शेख इरफान शेख रहीन ( वय, 35 ) असं अटक केलेल्या सात व्यक्तींच नावं आहे.

हेही वाचा - Umesh Kolhe Murder Case : नुपूर शर्मांच्या समर्थनात पोस्ट करणाऱ्यांना धमकी; ऑडिओ क्लिप आली समोर

Last Updated : Jul 4, 2022, 7:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.