ETV Bharat / city

Omicron in Amravati : अमरावती जिल्ह्यात बुधवारी ओमायक्रॉनचे 2 रुग्ण; कोरोना रुग्णसंख्याही वाढली - Amravati Corona Latest News

अमरावती जिल्ह्यात ओमायक्रोनचे दोन रुग्ण ( Omicron Cases in Amravati ) आढळून आले आहेत. तसेच जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत ( Corona Rise in Amravati ) आहे.

FILE PHOTO
फाईल फोटो
author img

By

Published : Jan 6, 2022, 6:11 AM IST

Updated : Jan 6, 2022, 11:12 PM IST

अमरावती - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Corona Second Wave) हॉटस्पॉट झालेल्या अमरावती जिल्ह्यात ओमायक्रोनचे दोन रुग्ण (Omicron Cases in Amravati) आढळून आले आहेत. तसेच जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत (Corona Cases Hike) आहे. मंगळवारी जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 39 रूग्ण आढळून आले होते. तर बुधवारी 47 नव्या रुग्णांची भर पडली आहे. शहरासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्ण आढळले असून, जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 152 वर पोहोचली आहे.

शहरात दोन ठिकाणं कंटेनमेंट झोन घोषित

मंगळवारी अमरावती शहरात एकूण 39 कोरोना रुग्ण आढळून आले होते, तपोवन परिसरात असणारे योगीराज नगर हा परिसर कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला. यासह कॅम्प परिसरात एकाच कुटुंबातील चार महिला कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट होताच हा भागही कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला. तसे फलकही या परिसरात लावण्यात आले आहेत.

चार लाख नागरिकांनी अद्याप कोरोना लस घेतली नाही

अमरावती जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील 81 टक्के नागरिकांनी कोरोनाची पहिली लस घेतली आहे. अद्यापही चार लाख नागरिकांनी पहिली लस घेतली नाही. लस न घेणे हे अतिशय घातक असल्याचे जिल्हाधिकारी पवणीत कौर यांनी सांगितले आहे. सध्या जे नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत, त्यापैकी अनेकांनी लस घेतली नसल्याचे दिसून येत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. जिल्ह्यात आठ लाख नागरिकांनी अद्यापही कोरोनाची दुसरी लस घेतली नाही. या आठ लाखांपैकी आजच्या तारखेत तीन लाख नागरिक कोरोनाची दुसरी लस घेऊ शकतात असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दुसरी लस घेण्याची मोहीम 30 डिसेंबर ते 15 जानेवारी दरम्यान राबवली जात असून संबंधित व्यक्तींनी दुसरी लस घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. लस घेतल्यामुळे कोरोना होणार नाही असे जरी नसले तरी कोरोनामुळे मृत्यू होणार नाही याची मात्र शाश्‍वती असून जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण व्हावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

महापालिका प्रशासन सज्ज

कोरोनावर मात करण्यासाठी 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचे झपाट्याने लसीकरण व्हावे यासाठी शहरातील 32 शाळांमध्ये लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. पहिला डोस घेतल्यावर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. अशा सर्वांना कोरोनाची दुसरी लस घरीच देण्यासाठी विशेष पथक नेमण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त प्रवीण अष्टीकर यांनी दिली. 10 जानेवारीपासून राज्य शासनाच्यावतीने वेगळ्या सूचना येणार असून त्या दृष्टीनेही तयारी केली जात असल्याचे प्रवीण आष्टीकर म्हणाले.

अशी आहे कोरोना रुग्णांची संख्या

अमरावती जिल्ह्यात सध्या एकूण 152 कोरोना रुग्ण आहेत. यापैकी 124 रुग्ण अमरावती शहरात आहेत, तर 28 रुग्ण ग्रामीण भागात आहेत. अचलपूर तालुक्यात तीन रुग्ण असून, अंजनगावसुर्जी तालुक्यात दोन रुग्ण आहेत, तर धामणगाव रेल्वे तालुक्यात सहा जण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे.

Last Updated : Jan 6, 2022, 11:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.