ETV Bharat / city

Trade Associations Strike In Amravati : जीएसटी विरोधात व्यापाऱ्यांचा संप, लाखोंची उलाढाल ठप्प - Trade Associations Strike In APMC

अन्नधान्यावर जीएसटी आकारण्याच्या निषेधार्थ अमरावतीत व्यापारी आक्रमक झाले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीत ( APMC ) कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट पहायला मिळत आहे.

traders strike
व्यापाऱ्यांचा संप
author img

By

Published : Jul 17, 2022, 9:52 AM IST

अमरावती - राज्यभरातील व्यापाऱ्यांप्रमाणेच जिल्ह्यातील व्यापारी जीएसटीतील जाचक नियमांविरोधात एकत्रित येत आहेत. अन्नधान्यावर जीएसटी ( GST on food grains )आकारण्याच्या निषेधार्थ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ( Agricultural Produce Market Committee ) व्यापाऱ्यांसह घाऊक व्यापारी, डाळ मिल असोसिएशन तसेच ईतरही व्यापारी संघटना यांनी आज कडकडीत बंद ( trade associations strike ) पाळला. विविध व्यापारी संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.

व्यापाऱ्यांचा संप

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुकशुकाट - दिवसाला १४ ते १५ कोटी उलाढाल असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वत्र शुकशुकाट होता. अन्नधान्य तसेच जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारे ठोक तथा किरकोळ व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ( Shops closed ) ठेवून संपात सहभागी झाले होते. त्यामुळे अमरावतीत व्यपारी वर्ग चांगलाच आक्रमक झाला आहे असे चित्र पहायला मिळत आहे.

व्यापाऱ्यांनी का पुकारला संप? - अन्नधान्य आणि खाद्यान्नावर (नॉन ब्रँडेड) जीवनावश्यक वस्तुवर पाच टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अतिरिक्त पाच टक्के जीएसटीची आकारणी केल्यामुळे अन्नधान्य यांसह दुग्धजन्य पदार्थ पनीर, दही, तूप, लोणी तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत. यामुळे सर्व सामान्य जनता महागाईत भरडल्या जाईल. जीवनावश्यक वस्तूवर ५ टक्के जीएसटी लागू झाल्यास ग्राहकांना त्याचा मोठा फटका बसेल . त्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांकडून जीएसटी आकरणीला विरोध करण्यात येत असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत संघटनेचे राजेश पाटील यांनी सांगितले.

डाळ मिल असोसिएशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन - जीवनावश्यक वस्तूवर जीएसटी लावणे हे अन्यायकारक आहे. जीएसटीचा अंतिम भार हा शेतकऱ्यांवरच पडतो. या संदर्भात आम्ही खासदार नवनीत राणा यांना तीन दिवसांपूर्वी तर जिल्हाधिकारी यांना आज निवेदन दिल्याची माहिती अमरावती जिल्हा डाळ मिल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष विजय मोहता यांनी सांगितले.

पुण्यात आम आदमी पार्टी आक्रमक - आम आदमी पक्षाच्यावतीने ( Aam Aadmi Party ) भर पावसात आज जीवनावश्यक वस्तूंची अंत्ययात्रा ( Funeral ) काढण्यात आली आहे. वीज दरवाढ, महागाई, इंधन दरवाढ, जीवनावश्यक खाद्यावर जीएसटी या विरोधात आता पुणेकर चांगेलच संतापले आहेत.कॅम्प परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जीवनावश्यक वस्तूंची अंत्ययात्रा काढण्यात आली. अरोरा टॉवरजवळ कॅम्प ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालापर्यंत भर पावसात अंत्ययात्रा काढून मोदी सरकारचा निषेध ( Protest Against Modi government ) व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी मोदी सरकारविरोधात विविध घोषणा देण्यात आल्या. केंद्र सरकारविरोधात फलकबाजी ( Posters against Central Govt ) करण्यात आली.

हेही वाचा - Maharashtra Politics : 'ये फेविकॉल जोड है, तुटेगा नहीं', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विश्वास !

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.