ETV Bharat / city

Umesh Kolhe Murder Case : नुपूर शर्मांच्या समर्थनात पोस्ट करणाऱ्यांना धमकी; ऑडिओ क्लिप आली समोर - नुपूर शर्मा

अमरावती शहरात औषधी विक्रेते उमेश कोल्हे ( Amol Kolhe Murder Case ) यांची नुपूर शर्मा ( Nupur Sharma ) यांच्या समर्थनात पोस्ट शेअर केल्यामुळे हत्या करण्यात आली होती. आता शहरातील ज्या ज्या व्यक्तींनी अशी पोस्ट शेअर केली आहे त्यांना मोबाईल फोनद्वारे धमकी ( Threat On Mobile Call ) मिळाली आहे. धमकीची ऑडिओ क्लिप आता समोर आली आहे. तथापि, या ऑडिओ क्लिपची इटीव्ही भारत पुष्टी करीत नाही.

warning on mobile
warning on mobile
author img

By

Published : Jul 4, 2022, 4:38 PM IST

Updated : Jul 4, 2022, 8:29 PM IST

अमरावती - नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट ठेवल्यामुळे अमरावतीमधील औषध विक्रेते अमोल कोल्हे यांची निर्घृण हत्या ( Amol Kolhe Murder Case ) करण्यात आली होती. या प्रकरणी सात शेख इरफान शेख रहीम या मास्टर माईंडसह सात जणांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे. मात्र, आता त्यानंतर अमरावती शहरातील ज्या व्यक्तींनी ही पोस्ट ठेवली होती त्यांनाही धमक्या येऊ लागल्या आहेत. अशीच एक धमकी देणारी ऑडिओ क्लिप उघड झाली आहे. या ऑडिओ क्लिपची इटीव्ही भारत पुष्टी करत नाही.

धमकी देणारा शेख इरफान शेख रहीमच्या संघटनेचा कार्यकर्ता - शहरातील डॉक्टर गोपाल राठी यांना राजीक मिर्झा नावाच्या व्यक्तीने मोबाईल फोनवर कॉल करून तुम्ही नुपूर शर्माच्या समर्थनात व्हॉट्सअप स्टेटस का ठेवले असा प्रश्न विचारून त्यांना तुमच्या विरोधात आम्ही सगळे एकत्रित येऊ हे योग्य नाही. नुपूर शर्माचे समर्थन तुम्हाला का करावेसे वाटले याचा खुलासा करा आणि व्हॉट्सअपवरच आमची जाहीर माफी मागा अन्यथा परिणाम योग्य होतील अशा स्वरुपाची धमकी दिली आहे. याच व्यक्तीने शहरातील जय मोबाईलच्या संचालकांना देखील अशा स्वरूपाचा कॉल करून धमकावले आहे. धमकी देणारा अमोल कोल्हे हत्या प्रकरणातील मास्टर माईंड शेख इरफान शेख रहीमच्या संघटनेचा कार्यकर्ता आहे.

मोबाईलवरून दिलेल्या धमकीत काय - राजीक मिर्झा नावाच्या व्यक्तीने डॉक्टर गोपल राठी यांना मोबाईलवरून धमकी दिली आहे. धमकीमध्ये तो उर्मटपणे डॉ. गोपाल राठी यांच्याशी बोलत असल्याचे दिसते. नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ व्हॉट्सअॅप स्टेटसवर पोस्ट का ठेवली असा प्रश्न त्याने राठी यांना थेट केला. त्यावर राठी हे त्यामागे आपला काहीही उद्देश नव्हता, इतरांनी ठेवले म्हणून आपणही व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवले असे सांगतात. मात्र, त्यावर राजीक मिर्झा म्हणतो की, नुपूर शर्मा यांनी मुस्लिम धर्मियांच्या विरोधात वक्तव्य केले आणि त्यांच्या समर्थनार्थ असे स्टेटस ठेवले आहे. म्हणजेच तुम्ही मुस्लिम धर्माच्या विरोधात कृत्य करीत आहात. त्यावर डॉ. गोपाल राठी हे आपला तसा काहीही उद्देश नव्हता, मी ते स्टेटस काढून घेतो, असे सांगतात. मात्र तरीही मिर्झा याचे समाधान होत नाही. त्यावर तो माफी मागी नाहीतर आम्ही सर्व तुमच्या विरोधात एक होऊ अशी धमकी देतो. या ऑडिओ क्लिपची इटीव्ही भारत पुष्टी करीत नाही.

पोलीस करीत आहेत तपास - डॉक्टर गोपाल राठी आणि जय मोबाईलच्या संचालकांना धमकीचा कॉल करणाऱ्या व्यक्तीबाबत पोलीस तपास करीत आहेत. ज्या व्यक्तींना धमकीचा कॉल आला त्यांची साक्षही पोलिस वतीने नोंदवून घेत जात आहेत. प्रारंभी एका हत्येचे प्रकरण भासणाऱ्या या घटनेने आता गंभीर वळण घेतले आहे. आता नुपूर शर्मा यांची पोस्ट ठेवणाऱ्यांनाही थेट धमक्या येऊ लागल्या आहेत. व्हॉट्सअॅपवरून थेट माफी मागावी, नसता आम्ही सर्व तुमच्या विरोधात एकत्र होऊ अशा धमक्या येऊ लागल्या आहेत.

गृहमंत्र्यांनी घेतली दखल - अमोल कोल्हे हत्या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यात लक्ष घातले आहे. हे प्रकरण एनआयएकडे देण्यास सांगितले आहे. एनआयएकडे हे प्रकरण दिले जाणार असल्याचे लक्षात येताच अमरावती पोलिसांनी वेगाने पावले उचलत या प्रकरणातील आरोपींची धरपकड सुरू केली. केंद्राकडून सुत्रे हलताच अमरावती पोलिसांनीही अमोल कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ त्यांनी पोस्ट केल्यानेच झाल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी मास्टरमाईंडसह सात जणांना अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणात मोबाईल कॉल करून धमक्यांचे प्रकरणही जोडले गेले आहे. त्यादृष्टीने पोलिस गांभीर्याने तपास करीत आहेत.

नवनीत राणा यांचा पोलिसांवर आरोप - 20 तारखेला अमोल कोल्हे यांची हत्या झाल्यानंतर जवळपास 10 दिवस या प्रकरणी पोलिसांनी गांभीर्याने पावले उचलली नाहीत, असा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवरही कारवाईची त्यांनी मागणी केली आहे. या प्रकरणी नवनीत राणार यांचे पती रवी राणा यांनी महाविकास आघाडी सरकारवर आरोप केला आहे. महाविकास आघाडी सरकारने सर्व काही माहिती असूनही हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप रवी राणा यांनी केला आहे.

हेही वाचा - Umesh Kolhe Murder Case : उमेश कोल्हे यांच्या हत्येचा मास्टर माइंड शेख इरफान शेख रहीमच

Last Updated : Jul 4, 2022, 8:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.