अमरावती - ईद निमित्त रविवारी परतवाडा येथे काढण्यात आलेल्या जुलूस दरम्यान आक्षेपार्ह नारेबाजी करण्यात आली तसेच गाणे वाजवण्यात आले. या संदर्भात बडनेराचे आमदार रवी राणा यांनी आता राज्यात उद्धव ठाकरेंचे सरकार नाही. त्यामुळे अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. सरकार बदललेले आहे हे लक्षात ठेवा असा मुस्लिम समाजाला इशारा देणारी प्रतिक्रिया दिली आहे.
गुन्हेगारांवर कारवाई होणार - परतवाडा येथे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुरेगारांविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, दोशींवर कठोर कारवाई केली जाईल असे देखील आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे.
दोघा जणांना अटक - परतवाडा येथे ईद निमित्य काढण्यात आलेल्या जुलूस दरम्यान आक्षेपारह गाणं वाजवल्या प्रकरणात पोलिसांनी एकूण दहा जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी शेख राहील आणि शेख हशम कादर खान या दोघा जणांना पोलिसांनी मंगळवारी पहाटे अटक केली आहे. इतर आरोपींना देखील लवकरच ताब्यात घेतल्या जाईल असे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्यासह परत वाड्याचे पोलीस निरीक्षक संतोष काले यांनी स्पष्ट केले आहे.