ETV Bharat / city

Har Ghar Tiranga : तिरंगा सोबत सेल्फी काढणाऱ्यांना कॉफी कॉर्नर मध्ये खास ऑफर - इरफान अथर अली

अमरावतीच्या सुंदरलाल चौक परिसरातील, हॅलो कॉर्नर या कॉफी हाऊसचे संचालक इरफान अथर अली, यांनी देखील 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियान यशस्वी करण्यास वेगळी कल्पणा अंमलात आणली आहे. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकवा; त्याचा सेल्फी काढून आणून दाखवा (Take a selfie with the tricolor), आणि आपल्या कॉफी हाऊस मधील कुठल्याही वस्तूवर दहा टक्के सूट (Get exclusive offers) मिळवा. अशी खास ऑफर इरफान अथर अली (Irfan Athar Ali) यांनी दिली आहे.

Har Ghar Tiranga
हर घर तिरंगा
author img

By

Published : Aug 10, 2022, 1:29 PM IST

अमरावती : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (Indian Independence Day) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानानुसार, 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियान यशस्वी करण्यास हातभार लागावा या उद्देशाने; प्रत्येकजण काहीना काही वेगळे करण्याचा प्रयत्न करीत आहे. अमरावतीच्या सुंदरलाल चौक परिसरातील, हॅलो कॉर्नर या कॉफी हाऊसचे संचालक इरफान अथर अली (Irfan Athar Ali), यांनी देखील एक वेगळी कल्पणा अंमलात आणली आहे. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकवा; त्याचा सेल्फी काढून आणून दाखवा (Take a selfie with the tricolor), आणि आपल्या कॉफी हाऊस मधील कुठल्याही वस्तूवर दहा टक्के सूट (Get exclusive offers) मिळवा. अशी खास ऑफर इरफान यांनी दिली आहे.

प्रतिक्रीया व्यक्त करतांना अधिकारी वर्ग व ग्राहक

अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फलकाचे अनावरण : हॅलो कॉर्नर कॉफी हाऊसचे संचालक इरफान अथर अली यांनी आपल्या कॉफी हाऊस समोर, आपल्या घरावर राष्ट्रीय ध्वज नेमका कसा फडकावा याची नियमावली देखील लावली आहे. या नियमावलीच्या फलकाचे उद्घाटन विभागीय उपायुक्त संजय पवार, पोलीस उपायुक्त विक्रम साळी आणि निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवाल यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला फेजरपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कुरळकर , तहसीलदार वैशाली पाथरे, संतोष काकडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

हॅलो कॉर्नर आहे युवकांचा कट्टा : अमरावती शहरातील हॅलो कॉर्नर हे कॉफी शॉप युवकांचा खास कट्टा असून; या ठिकाणी नेहमीच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गर्दी असते. 'हर घर तिरंगा' अभियानासाठी युवकांना प्रोत्साहित करणे तसेच कॉफी शॉप मध्ये येणाऱ्या प्रत्येकाला 'हर घर तिरंगा' अभियानाबाबत माहिती देण्याचे काम इरफान अथर अली करीत आहेत. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकवून त्याच्यासोबत काढलेला सेल्फी दाखविल्यावर हॅलो कॉर्नर येथील प्रत्येक वस्तूंच्या किमतीवर दहा टक्के सूट देण्यात आली आहे. हा उपक्रम आमच्या हॅलो कॉर्नर वर ग्राहक यावे या उद्देशाने नव्हे; तर 'हर घर तिरंगा' अभियान यशस्वी व्हावे, हा या मागचा हेतू आहे. याआधी सुद्धा राष्ट्राप्रती अभिमान जागविणारे अनेक उपक्रम हॅलो कॉर्नरच्या वतीने राबविण्यात आले असल्याचे, हॅलो कॉर्नरचे संचालक इरफान अथर अली यांनी सांगितले.

हेही वाचा : Seed Rakhi : पद्मश्री राहीबाईंची 'बीज राखी'; भाजप नेते चंद्रकांत पाटलांंसाठी बनवली खास राखी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.