ETV Bharat / city

Amravati Vidyalaya Suspicious death of a student : अमरावतीत विद्याभारती विद्यालयाच्या वस्तीगृहात विद्याथ्याचा संशयास्पद मृत्यू - आदर्श नितेश कोगे

अमरावती येथील रामपुरी कॅम्प परिसरात असणाऱ्या, (Vidyabharati Vidyalaya in Amravati) विद्याभारती माध्यमिक विद्यालयाच्या वस्तीगृहात १२ वर्षीय विद्याथ्याचा (Amravati Vidyalaya Suspicious death of a student) संशयास्पद मृत्यू झाला. गुरूवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. (Aadarsh Nitesh Koge) आदर्श नितेश कोगे (१२, रा. जामलीवन, ता. चिखलदरा) असे मृताचे नाव आहे. आपल्या मुलाचा मृत्यू नैसर्गिक नसून;तो घातपाताचा प्रकार असल्याचा आरोप, आदर्शचे वडील नितेश कोगे यांनी केला आहे.

Amravati Vidyabharati Secondary School Hostel
अमरावती विद्याभारती माध्यमिक विद्यालय वस्तीगृह
author img

By

Published : Jul 23, 2022, 1:31 PM IST

अमरावती : रामपुरी कॅम्प परिसरात असणाऱ्या, (Vidyabharati Vidyalaya in Amravati) विद्याभारती माध्यमिक विद्यालयाच्या वस्तीगृहात १२ वर्षीय विद्याथ्याचा (Amravati Vidyalaya Suspicious death of a student) संशयास्पद मृत्यू झाला. गुरूवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. (Aadarsh Nitesh Koge) आदर्श नितेश कोगे (१२, रा. जामलीवन, ता. चिखलदरा) असे मृताचे नाव आहे. आपल्या मुलाचा मृत्यू नैसर्गिक नसून;तो घातपाताचा प्रकार असल्याचा आरोप, आदर्शचे वडील नितेश कोगे यांनी केला आहे. दरम्यान, आदर्शचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविला जाणार आहे.

अशी आहे घटना : विद्याभारती शिक्षण संस्थेच्या वतीने स्थानिक रामपुरी कॅम्प भागात, विद्याभारती माध्यमिक विद्यालय व त्याच आवारात आदिवासी विद्याथ्यांसाठी निवासी वसतीगृह चालविले जाते. आदर्श हा विद्याभारती माध्यमिक विद्यालयाचा, इयत्ता सातवीचा विद्यार्थी होता. तो आवारातीलच विदयाभारती वस्तीगृहात अन्य विद्याथ्यांसमवेत राहत होता. दरम्यान, वस्तीगृहाचा चौकीदार नेहमीप्रमाणे गुरूवारी सकाळी हॉलमध्ये झोपलेल्या पाचवी ते दहावीतील विद्याथ्यांना उठविण्यास गेला. मात्र, आदर्शला आवाज दिल्यानंतरही तो न उठल्याने, चौकीदाराने त्याला हलवून उठण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने, गृहपाल रवी तिघाडे यांना माहिती देण्यात आली. व्यवस्थापन व विद्यालयाच्या मुख्याध्यापकाला देखील कळविण्यात आले. त्याला तातडीने डॉ. हेमंत मुरके यांच्या बालरूग्णालयात हलविण्यात आले. तेथून जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी आदर्शला मृत घोषित केले. याबाबत गाडगेनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. ठाणेदार आसाराम चोरमले जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचले. तर, दुपारी १२ च्या सुमारास आदर्शचे आईवडील व बरेचसे ग्रामस्थ देखील जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचले.

पोलीस आयुक्तांनी केली वस्तीगृहाची पाहणी : आदर्श नितेश कोगे या विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे विद्याभारती विद्यालयाच्या वस्तीगृह परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी, सायंकाळी अमरावतीच्या पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी वस्तीगृहाची पाहणी केली. यावेळी वस्तीगृहातील कर्मचारी, अधिकारी तसेच विद्यार्थ्यांशी पोलिस आयुक्तांनी संवाद साधला.

मारहाणीचा आरोप : आपल्याला मारले, असा संदेश आपल्या मुलाने २० जुलै रोजी दुपारी व्हॉट्सॲपवर पाठविला. आता त्याच्या पाठीवर मारहाणीच्या खुणा देखील दिसत आहे. जर अन्य विद्याथ्याशी त्याचा वाद झाला होता. तर आपल्या मुलाला गृहपालाने वेगळ्या खोलीत ठेवायला हवे होते. तसे न झाल्याने त्यांच्यात पुन्हा वाद झाला असेल. त्यातून मारहाण झाली असेल. आणि त्यात आपल्या मुलाचा मृत्यू झाला असावा,असा संशय आदर्शच्या वडिलांनी पोलिसांकडे व्यक्त केला. डीसीपी एम. एम. मकानदार व सहायक पोलीस आयुक्त पुनम पाटील यांनी पारदर्शक तपासाची ग्वाही देऊन प्रसंगी कुटुंबियांना शांत केले.

हेही वाचा : नाशिक : चिमुकलीला सोडून आईने भर पावसात काढला पळ, इगतपुरीतील धक्कादायक घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.