ETV Bharat / city

प्रचार सभेत आलेला अभिनेता सुनील शेट्टी भुयारी मार्गातून पळ काढत रुगणालयात लपला तेव्हा. . . ..

नवनीत राणा यांच्या निवडणूक प्रचारार्थ आलेल्या सुनिल शेट्टीवर भुयारी मार्गातून पळ काढत रुग्णालयात लपण्याची वेळ आली.

author img

By

Published : Apr 11, 2019, 7:22 PM IST

सुनील शेट्टी

अमरावती - महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या निवडणूक प्रचारार्थ आलेल्या सुनिल शेट्टीवर भुयारी मार्गातून पळ काढत रुग्णालयात लपण्याची वेळ आली. नवनीत राणा यांची सभा तिवसा येथील ग्रामपंचायत चौकात बुधवारी रात्री आयोजित करण्यात आली होती. यावेळी सुनिल शेट्टीला पाहण्यासाठी तुफान गर्दी झाल्याने सुनिल शेट्टीने रुग्णालयात लपून बसणे पसंत केले. यावेळी पोलिसांनी बळाचाही वापर केला.

तिवसा येथे प्रचार सभेत अभिनेता सुनील शेट्टी येणार असल्याने तिवसा शहरासह ग्रामीण भागातून नागरिक त्याला पाहण्यासाठी आले होते. यात प्रचंड उत्सुकता नागरिकांना लागली असताना सुनील शेट्टी रात्री 10.10 मिनिटामध्ये सभा मंडपात दाखल झाला. यावेळी लोकांना हात दाखवून सुनील शेट्टीने लोकांना अभिवादन केले. यात नागरिकांनी स्टेज व मंडपाजवळ घेराव घातला होता.

सुनील शेट्टीला पाहण्यासाठी झालेली गर्दी

यात सुनील शेट्टीला बाहेर जाण्यासाठी रस्ताच नसल्याने त्याने स्टेजमागील बाजूस भुयारी मार्गातून उडी घेतली. त्यानंतर थेट या भुयारी मार्गातून पळ काढत सुनील शेट्टी तिवसा ग्रामीण रुग्णालयात गेला. त्यामुळे नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात घेराव घातला. या ठिकाणी बोटावर मोजता येणारे पोलीस हजर होते. त्यामुळे हा गोंधळ उडाला. अखेर तिवसा पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात नागरिकांना हटवण्यासाठी बळाचा वापर केला. अखेर गर्दीतून सुनील शेट्टी सुखरूपपणे अमरावतीला रवाना झाला.

Intro:अमरावतीच्या तिवस्यात नवनीत राणांच्या प्रचार सभेत अभिनेता सुनील शेट्टी येताच गोंधळ.

भुयारी मार्गातून पळ काढत सुनील शेट्टी लपला 20 मिनिट शासकीय रुग्णालयात.
--------------------------------------------^
अमरावती अँकर

अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस राष्ट्रवादी पुरोगामी महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या निवडणूक प्रचारार्थ तिवसा येथिल जुन्या ग्रामपंचायत चौकात आज बुधवारी रात्री प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेचे प्रमुख आकर्षण होते ते म्हणजे प्रसिद्ध सिनेअभिनेता सुनिल शेट्टी याचीच
प्रचंड उत्सुकता ही हजारो तरुणाईला लागली होती. रात्री उशिरा १०.१०मिनीटांनी अभिनेता सुनील शेट्टी हा प्रचार सभेच्या स्थळी पोहचला आणि 5 मिनिटांच्या आतच गर्दी व सुरक्षेच्या कारणाने व हजारो नागरिकांची गर्दी असल्याने त्यांने मंडपाच्या मागील बाजूस असलेल्या भुयारी मार्गाने पळ काढून थेट तिवसा ग्रामीण रुग्णालयात २०मिनिट आश्रय घेतला यात प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याने सुनील शेट्टी यांना बाहेर जाण्यासाठी पोलिसांना बळाचाही वापर करावा लागला,.
तिवसा येथे प्रचार सभेत अभिनेता सुनील शेट्टी येणार असल्याचे तिवसा शहरासह ग्रामीण भागातुन नागरिक अभिनेता सुनील शेट्टी यांना पाहण्यासाठी आले होते यात प्रचंड उत्सुकता नागरिकांनी लागली असतांना सुनील शेट्टी रात्री१०.१०मिनिट मध्ये सभा मंडपात दाखल झाला यावेळी लोकांना हात दाखवून सुनील शेट्टी यांनी लोकांना अभिवादन केले यात नागरिकांनी स्टेज वर व मंडप जवळ घेराव घातला होता यात सुनील शेट्टी यांना बाहेर जाण्यासाठी रस्ताच नसल्याने त्यांनी स्टेज मागील बाजूस भुयारी मार्गातून उडी घेतली व थेट या भुयारी मार्गातून पळ काढत सुनील शेट्टी तिवसा ग्रामीण रुग्णालयात गेला त्यामुळे नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात घेराव घातला होता या ठिकाणी बोटावर मोजता येणारे पोलीस हजर होते त्यामुळे हा गोंधळ उडाला होता अखेर तिवसा पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात नागरिकांच्या गराड्यातुन बाहेर पडण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना हटवण्यासाठी बळाचा वापर केला अखेर गर्दीतुन सुनील शेट्टी यांना सुखरूप पणे अमरावती रवाना झालाBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.